मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! मराठवाडा, कोकण, कोल्हापूरसाठी मुंबईहून विशेष गाड्या, पाहा सविस्तर वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Diwali Special Train: मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली असून दिवाळी आणि छठ पूजेच्या सणाला गावी जाणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. विविध मार्गांवर 325 फेऱ्या धावणार आहेत.
मुंबई: सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर 14 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 24 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 2025 या काळात धावत असून प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण 325 फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुरु होणाऱ्या या गाड्या लातूर, दानापूर, करीमनगर, मुजफ्फरपूर, बनारस, गोरखपूर, मऊ, आसनसोल, तिरुवनंतपुरम, नागपूर, कोल्हापूर आणि सावंतवाडी रोड या प्रमुख ठिकाणी धावतील.
प्रमुख गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे:
advertisement
- 01007 लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - लातूर: 28.09.2025 ते 30.11.2025, प्रत्येक रविवार – 10 फेऱ्या
- 01017 LTT - दानापूर: 27.09.2025 ते 01.12.2025, सोमवार व शनिवार – 20 फेऱ्या
- 01021 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) - करीमनगर: 11.10.2025 ते 15.11.2025, शनिवार – 6 फेऱ्या
- 01043 LTT - मुजफ्फरपूर: 07.10.2025 ते 11.11.2025, मंगळवार – 6 फेऱ्या
- 01051 LTT - बनारस: 24.09.2025 ते 27.11.2025, बुधवार व गुरुवार – 20 फेऱ्या
- 01067 LTT - करीमनगर: 23.09.2025 ते 07.10.2025, मंगळवार – 60 फेऱ्या
- 01079 CSMT - गोरखपूर: 26.09.2025 ते 30.11.2025, दररोज – 66 फेऱ्या
- 01123 LTT - मऊ: 26.09.2025 ते 30.11.2025, शुक्रवार व रविवार – 20 फेऱ्या
- 01143 LTT - दानापूर: 25.09.2025 ते 30.11.2025, दररोज – 67 फेऱ्या
- 01145 CSMT - आसनसोल: 06.10.2025 ते 10.11.2025, सोमवार – 6 फेऱ्या
- 01179 LTT - सावंतवाडी रोड: 17.10.2025 ते 07.11.2025, शुक्रवार – 4 फेऱ्या
- 01417 CSMT - कोल्हापूर: 25.09.2025 ते 27.11.2025, गुरुवार – 10 फेऱ्या
- 01463 LTT - तिरुवनंतपुरम: 25.09.2025 ते 27.11.2025, गुरुवार – 10 फेऱ्या
- 02139 LTT - नागपूर: 25.09.2025 ते 27.11.2025, गुरुवार – 10 फेऱ्या
advertisement
या सर्व गाड्यांचे बुकिंग सुरू झाले असून ते www.irctc.co.in वर तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध आहे. प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अॅप द्वारे तपशीलवार वेळापत्रक थांबे आणि सीट उपलब्धतेबाबत माहिती मिळवावी. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सणाच्या काळात त्यांच्या गावी जाणे अधिक सुलभ होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 12:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! मराठवाडा, कोकण, कोल्हापूरसाठी मुंबईहून विशेष गाड्या, पाहा सविस्तर वेळापत्रक