कोकणकरांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीत धावणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या कधी आणि कुठे?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Konkan Railway: कोकणकरांसाठी रेल्वेने खास दिवाळी गिफ्ट दिलंय. त्यामुळे प्रवास अधिक सोपा होणार आहे. कोकण आणि कर्नाटकसाठी 6 विशेष रेल्वे धावणार आहेत.
मुंबई: दिवाळीमध्ये शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयांना सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक फिरायला जातात किंवा गावाकडे प्रवास करतात. या वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई, मडगाव, वास्को आणि बंगळूरू या प्रमुख मार्गांवर धावणार आहेत.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
1) गाडी क्र. 07366 मडगाव जंक्शन – बंगळूरू (सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलमार्गे बंगळूरू एक्सप्रेस)
मडगाव येथून सुटेल: शनिवार, सकाळी 6.30 वाजता
बंगळूरू येथे पोहोचेल: त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता
एकूण डबे: 20
2) गाडी क्र. 06205 बंगळूरू – मडगाव एक्सप्रेस
advertisement
बंगळूरू येथून सुटेल: रविवार, दुपारी 12.00 वाजता
मडगाव येथे पोहोचेल: दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता
3) गाडी क्र. 06206 मडगाव – बंगळूरू एक्सप्रेस
मडगाव येथून सुटेल: सोमवार, सकाळी 6.30 वाजता
बंगळूरू येथे पोहोचेल: त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता
4) गाडी क्र. 07317 क्रांतीवीरा सांगोली रायन्ना बंगळूरू – वास्को द गामा विशेष एक्सप्रेस
advertisement
बंगळूरू येथून सुटेल: शुक्रवार, रात्री 11.25 वाजता
वास्को येथे पोहोचेल: दुसऱ्या दिवशी दुपारी 2.55 वाजता
5) गाडी क्र. 07318 वास्को द गामा – बंगळूरू विशेष एक्सप्रेस
वास्को येथून सुटेल: शनिवार, सायंकाळी 5.00 वाजता
बंगळूरू येथे पोहोचेल: दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता
एकूण डबे: 22 (LHB)
6) गाडी क्र. 07365 एसएसएस हुबळी जंक्शन – मडगाव जंक्शनमार्गे यशवंतपूर जंक्शन एक्सप्रेस
advertisement
हुबळी येथून सुटेल: शुक्रवार, पहाटे 5.15 वाजता
मडगाव येथे पोहोचेल: दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता
विशेष गाड्यांमुळे दिवाळीच्या काळात प्रवाशांना प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. कोकण रेल्वेने प्रवाशांना लवकर आरक्षण करण्याचे आवाहन केले असून, गर्दीच्या काळात नियोजित प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 17, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कोकणकरांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीत धावणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या कधी आणि कुठे?










