कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, 21 ऑक्टोबरपासून वेळापत्रक बदलणार, आता ट्रेन सुस्साट सुटणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Konkan Railway: ऐन दिवाळीत कोकणातील प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. आता कोकण रेल्वे पुन्हा वेगाने धावणार असून 21 ऑक्टोबरपासून वेळापत्रक बदलणार आहे.
मुंबई: कोकणात जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक नेहमीपेक्षा 15 दिवस आधीच संपुष्टात येत आहे. म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून सर्व गाड्या पुन्हा त्यांच्या नेहमीच्या वेळेनुसार धावणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना यामुळे मोठा फायदा होणार असून, मुंबई ते कोकण हा प्रवास आता अधिक जलद आणि सोयीचा ठरणार आहे.
पावसाळ्यातील सावधगिरीमुळे कमी गती
कोकण रेल्वे मार्ग डोंगराळ आणि निसर्गरम्य असल्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याची आणि दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग कमी ठेवावा लागतो. सुरक्षेच्या दृष्टीने दरवर्षी 10 जूनपासून 31 ऑक्टोबरपर्यंत ‘पावसाळी वेळापत्रक’ लागू असते.
advertisement
मात्र यंदा कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाआधीच दुरुस्ती व देखभाल कामे पूर्ण केल्याने वेळापत्रकात बदल केला. या वर्षी पावसाळी वेळापत्रक 15 जूनपासून 20 ऑक्टोबरपर्यंतच ठेवण्यात आले आहे.
21 ऑक्टोबरपासून पुढील लोकप्रिय गाड्या नियमित वेळेनुसार धावणार
1) कोकणकन्या एक्सप्रेस (सीएसएमटी–मडगाव)
2) जनशताब्दी एक्सप्रेस
3) वंदे भारत एक्सप्रेस
4) तेजस एक्सप्रेस
5) एलटीटी–करमळी एक्सप्रेस
advertisement
6) दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस
7) सीएसएमटी–मंगळूर जंक्शन
यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळेत आणि जलदगतीने पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
सुरक्षित आणि वेगवान प्रवासाकडे वाटचाल
739 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गापैकी वोर ते उडुपी या 646 किमी पट्ट्यात विशेष काळजी घेण्यात येते. या भागात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने, पावसाळ्यात रेल्वेगाड्यांचा वेग मर्यादित ठेवला जातो. मात्र, आता हवामान स्थिर झाल्याने आणि पायाभूत कामे पूर्ण झाल्याने गाड्यांचा वेग वाढविण्यास परवानगी मिळाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2025 9:10 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, 21 ऑक्टोबरपासून वेळापत्रक बदलणार, आता ट्रेन सुस्साट सुटणार