7 एपिसोडची ही क्राइम थ्रिलर सीरिज, Netflix वर करतेय ट्रेंड, वीकेंडला पाहून टाका

Last Updated:
OTT Netflix Web Series : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एक सात एपिसोडची सीरिज सध्या प्रचंड गाजतेय. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
1/7
 OTT वर सध्या एका सीरिजचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. 7 एपिसोडच्या या सीरिजला IMDB वर 7.5 रेटिंग मिळाले आहे. या क्राइम सीरिजचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. या सीरिजमध्ये ड्रामा, माइंड गेम आणि अॅक्शन या गोष्टींचं मिश्रण आहे.

advertisement
2/7
 वीकेंडला काय पाहायचं याचा विचार करताय? मग ओटीटीवर ट्रेंड करत असलेली एक सीरिज तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या सीरिजची स्टोरी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या क्राइम सीरिजमध्ये एकूण 7 एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड थ्रिलिंग आहे. तर झोप उडवणारा क्लायमॅक्स आहे.

3/7
 नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत असलेल्या या सीरिजची कथा एअरपोर्टवर रुटीन कस्टम चेकदरम्यान गैरकृत्य करत असलेल्या कुरिअर प्रकरणापासून सुरू होते. पुढे या सीरिजमध्ये भ्रष्टाचार, धोका आणि हाय-टेक स्मगलिंग ऑपरेशन दाखवण्यात आलं आहे.

4/7
 संसदेत याप्रकरणाचा विषय निघतो. त्यानंतर मुंबई एअरपोर्टवर स्मगलिंगच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री एका हुशार आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची निवड करतात. पुढे हा ऑफिसर आपल्या खास टीमला बोलावतो. अधिकारी या प्रकरणाचा व्यवस्थित शोध लावतो. महत्त्वाचे म्हणजे हे स्मगलिंग सिंडिकेट यूरोप, वेस्टर्न एशिया आणि दक्षिण पूर्ण एशियापर्यंत पसरलेलं आहे.

5/7
 दिग्दर्शक आणि लेखकाने ओटीटीवरील ही सीरिज पाहताना प्रेक्षकांना कंटाळा येणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. त्यांनी केलेला रिसर्च ही सीरिज पाहताना स्पष्ट दिसतो. देशभक्ति, कर्तव्य आणि हिंमत अशा अनेक गोष्टी या सीरिजमध्ये पाहायला मिळतील. 7 एपिसोडची ही सीरिज एक हाय-स्टेक्स रोलर कोस्टर राइड आहे.

6/7
 नेटफ्लिक्सच्या या सीरिजमध्ये प्रकाश या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या भूमिकेत अनुराग सिन्हा आहे. अनुराग सिन्हा आपल्या मदतीने अर्जुन मीना (इमरान हाशमी), मिताली (अमृता खानविलकर) आणि रविंदर गुर्जर (नंदिश संधू) यांची निवड करतो.

7/7
 नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत असलेली ही सीरिज इमरान हाशमीची 'तस्करी' (Taskaree) आहे. 14 जानेवारीला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. ओटीटीवर रिलीज होताच ही सीरिज ट्रेंड करत आहे. इमरान हाशमी, शरद केळकर, नंदिश संधु, अनुराग सिन्हा, अमृता खानविलकर, जोया अफरोज हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर नीरज पांडे यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement