वापर न करताही डिस्चार्ज का होते फोनची बॅटरी? हे कारण जाणून चक्रावाल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अनेकदा आपण फोन काहीच वापरत नाही. पण तरीही फोनची बॅटरी ही लवकर डिस्चार्ज होते. यामागे काही कारण आहेत. आपण याविषयीच आज जाणून घेणार आहोत.
आपण फोन वापरतो तेव्हा त्याची बॅटरी ड्रेन होते. फोनची स्क्रिन सर्वात जास्त बॅटरीचा वापर करते. मात्र अनेकदा असंही होतं की, आपण फोन वापरत नाही, पण तरीही फोनची बॅटरी डिस्चार्ज होते. खरंतर यामागे अनेक कारणं असतात. जे सतत बॅटरी ड्रेन करत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत की, वापर न करताही फोनची बॅटरी डिस्चार्ज का होते.
advertisement
कमकुवत नेटवर्क : आपल्या फोनमध्ये कमकुवत नेटवर्क असते, तेव्हा याचा परिणाम बॅटरीवरही पडतो. कमकुवत नेटवर्क किंवा नेटवर्क नसल्यामुळे तुमचा फोन सतत नेटवर्क सच करतो. ज्यामुळे बॅटरीवर लोड पडतो आणि ही लवकर डिस्चार्ज होते. 5G नोटवर्कला सर्च केल्याने फोन सर्वात जास्त आणि Wi-Fi सर्च करण्यात सर्वात कमी बॅटरीचा वापर करतो.
advertisement
बॅकग्राउंड अ‍ॅक्टिव्हिटी : तुमच्या फोनवर स्टोअर केलेले अ‍ॅप्स सतत चालतात. तुम्ही ते वापरत नसतानाही, ते बॅकग्राउंडमध्ये डेटा सिंक करत राहतात. यामुळे ते चालू राहू शकतात आणि तुम्ही ते वापरत नसतानाही बॅटरी पॉवर वापरतात. तुमच्या फोनवर असे अ‍ॅप असेल जे तुम्ही नियमितपणे वापरत नसाल, तर तुम्ही त्याची बॅकग्राउंड अ‍ॅक्टिव्हिटी रेस्ट्रिक्ट करू शकता.
advertisement
advertisement
सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लम : अनेकदा फोनच्या सॉफ्टवेअर किंवा अॅप्समध्ये प्रॉब्लम असल्यामुळेही बॅटरीवर जास्त लोड पडतो. यामुळे तुमच्या सॉफ्टवेअर आणि अॅप्सला अपडेटेड ठेवा. यामुळे परफॉर्मेंसही चांगला होतो आणि तुम्हाला सायबर धोक्यांच्या बाबतीत सुरक्षा मिळते. यासोबतच फोन आठवड्यातून किमान एकदा अवश्य रिस्टार्ट करा.








