Mauni Amavasya: पौष महिन्यासोबतच अशुभ टळू दे! अमावस्येला राशीनुसार केलेले उपाय कामी येतील

Last Updated:
Mauni Amavasya 2026 Upay: मार्गशीर्ष महिन्यात सर्वांनी शुभ कामे आटोपून घ्यायची गडबड होती, कारण पुढे पौष महिना लागणार होता. आता अशुभ मानला जाणारा पौष महिना संपत आला आहे. पौष महिन्यात येणारी अमावस्या तिथी 'मौनी अमावस्या' म्हणून ओळखली जाते. यावर्षी ही शुभ तिथी 18 जानेवारी 2026, रविवारी आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि पितरांचे तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. यावेळच्या मौनी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग आणि हर्षण योग जुळून येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
1/8
ज्योतिषशास्त्रानुसार मौनी अमावस्येला आपल्या राशीनुसार काही उपाय केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. राशीनुसार खालील उपाय करावेत:

advertisement
2/8
मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी - या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मौनी अमावस्येला गरीब आणि गरजू लोकांना शेंगदाणे, तीळ, गूळ, धान्य आणि फळांचे दान करा. तसेच मुंग्यांना साखर खाऊ घाला.

3/8
वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी - या राशींचा स्वामी शुक्र ग्रह आहे. मौनी अमावस्येला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते घरात एखाद्या गुप्त ठिकाणी ठेवा आणि तुळशीची सकाळी-संध्याकाळी पूजा करा. या दिवशी पांढरे वस्त्र, तांदूळ, दूध, मोती आणि साखर या वस्तूंचे दान करणे शुभ ठरेल.

4/8
मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी - या राशींचा स्वामी बुध ग्रह आहे. मौनी अमावस्येला शिवलिंगाचा अभिषेक करा आणि 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला आणि संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने दिवा लावा.

5/8
कर्क रास - कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या दिवशी घराची कच्च्या दुधाने स्वच्छता करावी (पाण्यात थोडे दूध मिसळून पुसून घ्यावे). तांदूळ, दूध आणि पांढऱ्या तिळाचे दान करा. संध्याकाळी 'ॐ सोम सोमाय नमः' मंत्राचा जप करत चंद्राला अर्घ्य द्या.

6/8
सिंह रास - सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या दिवशी गरजू लोकांना गहू, लाल वस्त्र आणि गुळाचे दान करा. तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. यामुळे मान-सन्मानात वाढ होते आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो.

7/8
धनु आणि मीन राशीच्या लोकांनी - या राशींचा स्वामी गुरु ग्रह आहे. मौनी अमावस्येला एखाद्या नदीत किंवा तलावात पितरांच्या नावाने दीपदान करा. तसेच साधू-संतांना अन्न किंवा वस्तू दान करा.

8/8
मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी - या राशींचा स्वामी शनिदेव आहे. मौनी अमावस्येला गरीब व्यक्तीला साजूक तूप, काळे तीळ, काळे वस्त्र किंवा चप्पल-बूट दान करा. तसेच जवळच्या कडुलिंबाच्या झाडाला पाणी घाला.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement