टीचर-स्टुडंटची अनोखी प्रेमकहाणी! विद्यार्थिनीच्याच प्रेमात पडला अभिनेता, संधी मिळताच केलं असं काही...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
या अभिनेत्याने बॉलिवूड आणि साऊथ दोन्ही सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. त्याला त्याच्याच विद्यार्थिनीसोबत प्रेम झालं आणि त्याने पटकन संधी साधून तिच्याशी लग्नही केलं!
advertisement
advertisement
आज म्हणजेच १ जून रोजी आपला वाढदिवस साजरा करणारे अभिनेते आर. माधवन (R. Madhavan) आणि त्यांची पत्नी सरिता बिर्जे हे इंडस्ट्रीतील सर्वात लाडकं जोडपं मानलं जातं. त्यांची प्रेमकहाणी ही खरंच एखाद्या चित्रपटाची कथा असावी अशीच आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातील आपल्या रोमँटिक अंदाजाने लाखो मुलींना वेड लावणारे आर. माधवन यांना त्यांचं पहिलं प्रेम मिळालं, जेव्हा ते स्वतः एक शिक्षक होते आणि त्यांची होणारी पत्नी त्यांची विद्यार्थिनी होती!
advertisement
माधवन इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच सरिताला भेटले होते. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला, सरिताने कोल्हापूरमध्ये एका कम्युनिकेशन वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. याच वर्कशॉपमध्ये माधवन शिक्षक म्हणून शिकवत होते. इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर, माधवन सोशल कम्युनिकेशनचे वर्ग घेऊ लागले होते, तर सरिता त्यावेळी एअर होस्टेस म्हणून काम करत होती.
advertisement
एका सेशननंतर सरिताने माधवनला डिनरसाठी बाहेर जाण्याची विचारणा केली आणि माधवनने लगेचच या संधीचा फायदा घेतला! माधवनने TOI ला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, "सरिता माझी विद्यार्थिनी होती आणि तिने एका दिवशी मला डेटवर येण्यासाठी विचारलं. मी एक साधासा सावळा माणूस होतो आणि मला वाटलं की हीच संधी आहे. मी कधी लग्न करेन की नाही हे मला माहीत नव्हतं, त्यामुळे मी या संधीचा फायदा घेतला आणि तिच्याशी लवकरच लग्न केलं."
advertisement
त्यांनी लग्न करण्यापूर्वी तब्बल ८ वर्षं एकमेकांना डेट केलं. आर. माधवन आणि सरिता यांनी १९९९ मध्ये पारंपरिक तामिळ रितीरिवाजानुसार लग्न केलं. या लग्नसोहळ्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे, सरिताशी लग्न केल्यानंतरच माधवनने मनोरंजन क्षेत्रात आपलं नाव कमावलं. आज ते दोघे एका मुलाचे पालक आहेत.
advertisement
इंडस्ट्रीतील 'डिंपल-बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधवनला दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या हिट चित्रपट 'अलाइपायुथे'मुळे खरी ओळख मिळाली. त्यांनी लवकरच एका रोमँटिक हिरोची इमेज बनवली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 'कन्नथिल मुथमित्तल', 'रन', 'अंबे शिवम' आणि 'आयुथा एझुथु' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी यश मिळवलं. २००१ मध्ये आलेल्या 'रहना है तेरे दिल में' आणि २०१७ मधील 'विक्रम वेधा' या चित्रपटांनंतर तर लोक त्यांचे चाहतेच झाले.