पायाला जखम, ताप, त्यात अभिनेत्रीला आले पीरियड्स, कन्स्ट्रक्शन साइटवर शूट झालेलं बॉलिवूडचं मोस्ट रोमँटीक गाणं

Last Updated:
Tip tip Barsa Pani : बॉलिवूडमधील आयकॉनिक गाण्यांमध्ये 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचा समावेश आहे. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. पण या गाण्याच्या शूटिंगदरम्यान रवीना टंडनला प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.
1/7
 पाऊस आणि बॉलिवूड यांचं नातं फार जुनं आहे. पावसात भिजणारे हिरो-हिरोईन आणि जोडीला संगीत ही आजही बॉलिवूडची खास ओळख आहे. बॉलिवूडमधील अनेक शूटिंग पावसात करण्यात आलं आहे.

advertisement
2/7
 ऐश्वर्यावर चित्रित झालेलं 'बरसो रे मेघा-मेघा' असो किंवा माधुरीवर चित्रित 'कोई लड़की है' या सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. या यादीत अजून एक गाणं आहे जे आजही लोकांचं आवडतं गाणं आहे ते म्हणजे,'टिप टिप बरसा पानी'.

3/7
 रवीना टंडन आणि अक्षय कुमारवर चित्रित झालेल्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याची आजही तेवढीच क्रेझ आहे. पण या गाण्याच्या शूटिंगदरम्यान रवीनाला प्रचंड त्रास झाला होता. अभिनेत्रीला थेट डॉक्टरांकडे जावं लागलं होतं.

4/7
 'टिप टिप बरसा पानी'च्या शूटिंगदरम्यान रवीना जखमी झाली होती. रवीना टंडनने रिअॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर 4' मध्ये या गाण्याच्या शूटिंगमागची गोष्ट शेअर केली होती. तिने सांगितलं की, 'टिप टिप बरसा पानी'च्या शूटिंगमुळे तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. रवीना म्हणाली की, हे गाणं एका कन्स्ट्रक्शन साइटवर शूट केलं जात होतं. त्यामुळे तेव्हा तिचे पाय जखमी झाले होते. तसेच त्यावेळी तिला पीरियड्सदेखील आले होते. त्यामुळे तिचं पोट दुखत होतं. दुसरीकडे पावसात भिजल्याने तिला तापही आला होता.

5/7
 'टिप टिप बरसा पानी'च्या शूटिंगबाबत बोलताना रवीना म्हणाली,"हे गाणं कन्स्ट्रक्शन साइटवर शूट केलं जात होतं. मी अनवाणी पायांनी शूट करत होते त्यामुळे पायाला दुखापत झाली. पावसात भिजल्यामुळे मला ताप आला आणि मी आजारी पडले. तुम्हाला स्क्रीनवर जे ग्लॅमर दिसतं, त्यामागे वास्तव काही वेगळंच असतं. रिहर्सलदरम्यान आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा जखमा होतात, पण तरीही आम्हाला आमचं काम करत राहावं लागतं. कितीही वेदना होत असतील तरी हसत-हसत काम करावं लागतं.

6/7
 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं 1994 साली रिलीज झालेल्या 'मोहरा' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि नसीरुद्दीन शाह यांसारखे कलाकार होते.

7/7
 अक्षय कुमार आणि रवीना टंडनवर चित्रित झालेलं 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं त्यावेळी सुपरहिट ठरलं होतं आणि आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement