advertisement

Red Soil Story च्या पूजाला 6 महिन्यांत 2 मोठे धक्के, नवरा शिरिष गवसनंतर अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

Last Updated:
रेड सॉइल स्टोरी या प्रसिद्ध युट्यूब चॅनेलचा शिरिष गवसचं काही महिन्यांआधी निधन झालं. त्यानंतर त्याची पत्नी पूजा गवस पुन्हा काम करू लागली होती. पण पतीच्या निधनानंतर सहा महिन्यात पूजाच्या आयुष्यात आणखी एक वादळ आलं आहे.
1/8
सोशल मीडियाच्या जगात आपल्या कामानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी रेड सॉइल स्टोरीचे पूजा आणि शिरिष गवस यांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. ऑगस्ट महिन्यात शिरिष गवसचं ब्रेक हॅम्रेजनं निधन झालं. शिरिषच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी पूजा गवस आणि मुलगी श्रीजा असा परिवार होता.

2/8
शिरिषच्या मृत्यूनंतर पूजा पूर्णपणे खचली. काही महिन्यांनी तिनं रेड सॉइल स्टोरी हे तिचं युट्यूब चॅनेल पुन्हा सुरू केलं होतं. आयुष्याची नवीन सुरुवात करत असताना पूजाच्या आयुष्यात आणखी एक वादळ आलं. नवरा गमावल्यानंतर पूजाने तिचे वडिलही गामवलेत. पूजाच्या वडिलांचं निधन झालं असून तिनं सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट लिहित ही माहिती दिली. 

3/8
पूजाचे वडिल कॅन्सरग्रस्त होते. गेली 11 वर्ष ते कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत होते. शिरिषचं निधन होण्याआधी तिच्या वडिलांची तब्येतही खूप जास्त बिघडली होती. शिरिषच्या निधनानंतर सहा महिन्यांनी पूजाच्या वडिलांचं निधन झाल्यानं तिच्यावर आणखी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

4/8
पूजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय,
पूजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "प्रिय पपा, अखेर तुम्ही सुद्धा सोडून गेलात. आधी श्रीजाने तिचा बाबा गमावला आणि आता तिचे आजोबा. आता कुठे एका वादळातून किनारा गाठण्याचा प्रयत्न सुरू होता आणि नशिबाने दुसरे चक्रीवादळ पुढ्यात आणून ठेवले."
advertisement
5/8
 "11 वर्ष तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज दिलीत. ती सुद्धा न डगमगता न हार मानता. खर सांगू जेव्हा शिरीषच्या आजाराबद्दल पहिल्यांदा कळला तेव्हा सर्वात आधी तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर आला होतात. वाटलेला तुम्ही इतके वर्ष आजाराशी दोन हात करताय मग शिरीषला सुद्धा काहीच होणार नाही. पण आज सगळेच विचार, सगळे निश्चय हरले."

6/8
पूजाने पुढे लिहिलंय,
पूजाने पुढे लिहिलंय, "या आजाराच्या कितीतरी जीवघेण्या यातना तुम्ही कसलीच तक्रार न करता सहन केल्या. तुमची आलेल्या परिस्थितीशी लढण्याची ताकद माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील. माझं विचारांनी दाटलेलं मन मोकळं करण्यासाठी रोज संध्याकाळी मी आणि श्रीजा तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचो. पण आता तो मार्ग सुद्धा देवाने कायमचा बंद केला. या सगळ्यासाठी देवा तुझे किती आभार मानू."
advertisement
7/8
 "अजून काय काय लिहून ठेवलयस माझ्या साठी ते एकदाच सांगुनच टाक. तू दुःख देत राह पण ते पेलण्याची ताकद सुध्दा तूच दे. तुमच्या आजारपणात ज्या खंबीरपणे तुम्हाला मम्मीने साथं दिलीये तोच खंबीरपणा घेऊन मी जगायचं ठरवलंय.. काही झालं तरी हार मानायची नाही हे शिकवण तुम्ही दोघांनी दिलीये. जोपर्यंत श्वास घेतोय तोपर्यंत लढत रहायचं."

8/8
 "पपा.. जिथे कुठे असाल सुखात राह. कायम पाठीशी राहा. शिरीषशी भेट झाली तर त्याला सांगा आम्ही आमची काळजी घेतोय..तू निश्चिंत रहा. आम्हाला आशीर्वाद देत राह. तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना"

PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement