अल्पवयीन अभिनेत्रीला न सांगता शूट केला Kissing Scene, रडून रडून झाली वाईट अवस्था, लोक वाजवत राहिले टाळ्या

Last Updated:
Bollywood Controversies : या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा झाली, पण तिच्या करिअरमधील एका घटनेने तिला आतून पूर्णपणे हादरवून सोडलं होतं.
1/10
मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून राज्य करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रेखाचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना वेड लावलं. पण, रेखाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले.
advertisement
2/10
तिच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा झाली, पण तिच्या करिअरमधील एका घटनेने तिला आतून पूर्णपणे हादरवून सोडलं होतं. जेव्हा ती अवघी १५ वर्षांची होती, तेव्हा एका अभिनेत्याने तिला न सांगता किस केलं आणि दिग्दर्शकाने कट म्हटलं नाही.
advertisement
3/10
हा किस्सा आहे १९६९ मध्ये आलेल्या ‘अनजाना सफर’ या चित्रपटाचा. या चित्रपटात रेखासोबत अभिनेता बिस्वजीत चटर्जी होते आणि दिग्दर्शन राजा नवाथे करत होते.
advertisement
4/10
या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, ज्याचा उल्लेख यासीर उस्मान यांनी रेखाच्या बायोग्राफीत केला आहे.
advertisement
5/10
या चित्रपटातील एका रोमँटिक सीनचं शूटिंग महबूब स्टुडिओमध्ये सुरू होतं. दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता यांना माहित होतं की काय होणार आहे, पण रेखाला मात्र काहीच कल्पना नव्हती.
advertisement
6/10
दिग्दर्शकाने 'ॲक्शन' म्हणताच, बिस्वजीत चटर्जीने अचानक रेखाला आपल्या मिठीत घेतलं आणि तिला किस करू लागले. रेखा पूर्णपणे गोंधळून गेली. हा सीन स्क्रिप्टमध्ये नव्हता, तरीही कॅमेरा सुरूच होता.
advertisement
7/10
पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, हा किस पाच मिनिटांपर्यंत सुरूच होता. बिस्वजीत चटर्जी रेखाला सोडून देत नव्हते आणि दिग्दर्शक ‘कट’ म्हणत नव्हते.
advertisement
8/10
युनिटमधील लोक टाळ्या वाजवत होते आणि शिट्ट्या मारत होते. हे सगळं पाहून रेखाला मोठा धक्का बसला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती काहीच करू शकली नाही.
advertisement
9/10
या घटनेबद्दल रेखाने नंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी खूप हैराण झाले होते. माझ्यासोबत जे घडलं, त्याची भरपाई कोणीच करू शकत नाही.”
advertisement
10/10
त्यानंतर बिस्वजीत चटर्जीनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जे काही झालं ते दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून झालं. पण, त्यांनी हे मान्य केलं की, १५ वर्षांच्या रेखासोबत धोका झाला होता.
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement