पाकिस्तानमध्ये सैफ अली खानचे नातेवाईक, क्रिकेटशी आहे कनेक्शन; कोण आहेत ते?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Saif Ali Khan Relatives in Pakistan : अभिनेता सैफ अली खानचं कनेक्शन फक्त बॉलिवूड आणि क्रिकेटशी नाही तर पाकिस्तानशी आहे. सैफचे नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहतात. कोण आहेत ते?
advertisement
advertisement
पाकिस्तानमध्ये पाहत असलेल्या सैफ अली खानच्या नातेवाईकांचा संबंध पाकिस्तानची कूटनीती आणि क्रिकेटशीसुद्धा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे माजी चेअरमन आणि अनुभवी राजनयिक शहरयार खान हे सैफ अली खानचे नातेवाईक होते. ते सैफचे काका लागतात. त्यामुळे सैफ अली खानच्या कुटुंबाचा इतिहास भारत-पाकिस्तानच्या राजघराण्यांशी आणि क्रिकेटशी जोडलेला असल्याचं पाहायला मिळतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शहरयार खान यांनी पाकिस्तानचे करिअर डिप्लोमॅट म्हणून मोठी ओळख निर्माण केली. त्यांनी 1990 ते 1994 या काळात पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव म्हणून काम केलं. राजकीय कारकिर्दीत त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधांच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. परराष्ट्र धोरणाच्या संवेदनशील काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली.
advertisement
advertisement
2014 ते 2017 दरम्यान 2009 च्या लाहोर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून जवळपास वेगळा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर PCB ची विश्वासार्हता आणि स्थिरता परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या निर्णयांवर कधी कौतुक तर कधी टीका झाली पण संक्रमणाच्या काळात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली गेली.








