सोनाक्षी सिन्हा मालामाल! 61% फायद्यात विकला वांद्र्यातला 4bhk फ्लॅट, एका महिन्याचं भाडं ऐकून दातखिळी बसेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सोनाक्षीने या नवीन वर्षाच्या सुरुवातीला वांद्र्यातला तिचा चार बीएचके फ्लॅट विकला आहे. त्यातून तिने ६१ टक्के नफा कमावला आहे.
advertisement
advertisement
मुंबईतील मोठा कमर्शियल हब असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नव्याने निर्माण झालेली मेट्रो रेल्वेची उपलब्धता या सगळ्या कारणांमुळे बहुतांश कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, मोठमोठे उद्योजक, राजकारणी, कलाकार वांद्रे परिसरात घर घ्यायला कायमच उत्सुक असतात.
advertisement
advertisement
advertisement
इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनकडे (आयजीआर) नोंदवलेल्या कागदपत्रांचा हवाला देऊन स्क्वेअर यार्ड्जने याबद्दलची माहिती दिली आहे. सोनाक्षीने हा फ्लॅट मार्च २०२० ला १४ कोटी रुपयांना विकत घेतला होता. तो जानेवारी २०२५ मध्ये २२.५० कोटी रुपयांना विकला आहे. म्हणजे या व्यवहारातून सोनाक्षीला ६१ टक्के परतावा किंवा नफा मिळाला आहे. आयजीआरच्या रेकॉर्डनुसार याच बिल्डिंगमध्ये सोनाक्षीच्या मालकीचा आणखी एक फ्लॅट आहे.
advertisement
विकलेल्या फ्लॅटचा कार्पेट एरिया ३९१.२ sqm (अंदाजे ४,२११ sqft) आणि बिल्ट-अप एरिया ४३०.३२ sqm (अंदाजे ४,६३२ sqft) आहे. त्याचबरोबर तीन कार पार्किंगही आहेत. जानेवारी २०२५ मध्ये नोंद झालेल्या या व्यवहारात सरकारला स्टॅम्प ड्युटीपोटी १.३५ कोटी रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून ३० हजार रुपये देण्यात आल्याचं या कागदपत्रांत म्हटलं आहे.
advertisement
advertisement