घरातच मिळालं अभिनयाचं बाळकडू, कोण आहेत थलापति विजयचे आई-वडील; ज्यांच्या विरोधात त्याने केलेला खटला

Last Updated:
अभिनेता थलापती विजय हा रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामुळे चर्चेत आहे. थलापती विजयचे आई-वडील कोण आहेत ज्यांच्या विरोधात त्याने काही वर्षांआधी खटला दाखल केला होता.
1/8
दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता आणि TVK पक्षाचा प्रमुख थलापती विजय यांच्या रॅलीत मोठी दुर्घटना घडली. या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 33 जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

advertisement
2/8
विजयच्या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आतुर झाले होते. मात्र, अचानक झालेल्या धावपळीमुळे आणि गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली. यात अनेकांना जीव गमवावा लागला.

3/8
आता अभिनेता विजयवर गुन्हा दाखल होणार की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी काही वर्षांआधी विजयनं त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. काय होतं ते प्रकरण?

4/8
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलापती विजय याने त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्याचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे अभिनेते, निर्माते आहेत. तर त्याची आई शोभा ही देखील कलाकार आहे. विजयने आई-वडील तसेच आणखी 11 जणांविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला होता .

5/8
विजयने आपल्या याचिकेत स्पष्ट केलं की, कोणीही त्यांच्या नावाचा वापर करून सभा किंवा गर्दी जमवू नये. कोणत्याही पक्षाच्या लाँचिंगला संमती दिलेली नाही. जर कोणी त्याचे नाव, फोटो किंवा फॅन क्लब वापरत असेल तर तो त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करेल असे त्याने म्हटले होते.

6/8
एस.ए. चंद्रशेखर यांनी 1993 मध्ये विजयसाठी एक फॅन क्लब सुरू केला होता. नंतर त्याचे रूपांतर कल्याणकारी संघटनेत करण्यात आले. गेल्या 25 वर्षांपासून ही संघटना लोकांसाठी काम करत आहे.

7/8
आता अधिक चांगलं काम करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षाचे अध्यक्ष पद्मनाभन, कोषाध्यक्ष शोभा तर स्वतः चंद्रशेखर सरचिटणीस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

8/8
विजयच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं की अभिनेत्याचा या पक्षाशी काहीही संबंध नाही. त्याचे नाव, प्रतिमा किंवा All India Thalapathy Vijay Makkal Iyakkam यांचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई होईल. 

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement