कोणतीही जुनी वस्तू मिळण्याचं ठिकाण, ‘इथं’ 90 वर्षांपासून भरतो हा बाजार
- Written by:News18 Marathi
- local18
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हा बाजार 90 वर्षांपासून भरत असून इथं सर्व प्रकारच्या वस्तू हमखास मिळतात.
रोजच्या वापरासाठी आपण वेगवगेळ्या वस्तूंची खरेदी करतो. त्यामुळे या वस्तू स्वस्तात कुठे मिळतील याचा शोध घेतला जातो. <a href="https://news18marathi.com/maharashtra/ahmednagar/">अहमदनगरमध्ये</a> मंगळवार बाजार असा बाजार आहे ज्या ठिकाणी तुम्ही साध्या सुईपासून ते कोणत्याही वाहनाच्या स्पेअर पार्ट्सपर्यंत आणि भाजीपाल्यापासून धान्य, किराणा, कपडे, चपलांपर्यंत कोणतीही वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भंगार गोळा करणारे कचरा वेचक वा कपड्यांवर भांडी विकणारे आपल्याला सापडलेले वा मिळालेले लोखंडी किंवा अन्य साहित्य डागडुजी करून नव्या रुपात या बाजारात आणतात. तर काहीजण जुने कपडे स्वच्छ करून बाजारात विकायला येतात. अशा सगळ्या पार्श्वभू्मीवर ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यातही मंगळवार बाजारचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे एकाच दिवसात लाखोंची उलाढाल होणाऱ्या नगरच्या 'मंगळवार बाजार'ची ओळख कायम आहे.








