Rakshabandhan: महाराष्ट्रात इथं बांबूची राखी, परदेशातही मागणी, वर्षाला 27 लाखांची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गेल्या 13 वर्षांपासून बांबूपासून राख्या बनवल्या जातात. त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांच्या राख्या परदेशातही पोहचल्या आहेत.
advertisement
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील धारणी तालुक्यात लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राद्वारे गेल्या 13 वर्षांपासून बांबूपासून राख्या बनवल्या जातात. त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांच्या राख्या परदेशातही पोहोचल्या आहेत. 'सृष्टीबंध' या नावाने राखीचा ब्रँड संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्षा निरुपमा देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
त्या सांगतात की, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील लवादा गावात संपूर्ण बांबू केंद्राच्यावतीने गेल्या 30 वर्षांपासून बांबू उद्योगात आदिवासी समुदायातील लोकांना रोजगार देण्याचे काम सुरू आहे. बांबूपासून विविध वस्तू बनवून त्याचे विक्री केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे. आता गेल्या 13 वर्षांपासून बांबूची राखी संपूर्ण बांबू केंद्रामध्ये बनवली जात आहे.
advertisement
आधी त्या लोकांना बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते या बांबू केंद्रात काम करतात. राखी बनविण्याच्या कार्यात एकूण 68 लोकांचा सहभाग आहे. या बांबूपासून बनवलेल्या राखींचा एक 'सृष्टीबंध' या नावाने ब्रँड तयार केला आहे. त्या नावानेच या राख्या परदेशात पोहोचल्या आहेत. मेळघाटातील एकूण 68 लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे, त्यांनी सांगितले.
advertisement
इतर राखीपेक्षा वेगळी कशी? पुढे त्या सांगतात की, मेळघाटच्या जंगलात असणाऱ्या बांबूपासून या राख्या बनवल्या जातात. अतिशय बारीक काम या राखीमध्ये केलं जातं. प्रत्येक व्यक्ती आपल्या कला कौशल्याने राखीच्या विविध आणि आकर्षक डिझाईन बनवतात. स्वतःच्या हाताने सर्वजण या राख्या तयार करतात. मार्केटमध्ये मिळणाऱ्या राखीपेक्षा ही राखी अतिशय वेगळी आणि आकर्षक असते. 30 रुपयांपासून किमतीच्या राख्या आमच्याकडे बनवल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनाही बांधली राखी 2018 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा ही बांबूची राखी मेळघाटमधील महिलांनी आणि मी बांधली होती. मी आणि आणखी पाच महिला ही राखी घेऊन दिल्लीला जाऊन पंतप्रधानांच्या हातावर बांबूपासून बनवलेली राखी आम्ही बांधली. तो क्षण आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता, असंही त्या सांगतात.
advertisement