Blood Purifying Food : घाण बाहेर काढून रक्त स्वच्छ करतील हे पदार्थ, अनेक गंभीर आजार राहतील दूर
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आपल्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक नसामध्ये रक्त वाहत असते. रक्त संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवते आणि शरीराच्या प्रत्येक भागातून कार्बन डायऑक्साइड काढून टाकते. रक्त सर्व प्रकारचे वायू, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, हार्मोन्स आणि इतर पोषक तत्वांचे संपूर्ण शरीरात वाहतूक करते. त्यामुळे आपले रक्त शुद्ध असणं फार आवश्यक आहे.
रक्त ही पहिली गोष्ट आहे, जी शरीराला कोणत्याही बाह्य आक्रमणापासून वाचवते. कोणत्याही सूक्ष्मजीवाने शरीरावर हल्ला केल्यास, रक्तातील WBC प्रथम तेथे पोहोचते आणि त्याला मारते. एवढी महत्त्वाची गोष्ट असल्याने रक्त शुद्धीकरणही खूप महत्त्वाचे आहे. काही पदार्थ तुमचे रक्त शुद्ध करण्यात मदत करू शकतात. नेटमेड्सडॉटकॉमने याबद्दल सविस्तर वृत्त दिले आहे.
advertisement
advertisement
कोथिंबीर आणि धणे : कोथिंबीर शरीराला पारा आणि इतर जड धातूपासून मुक्त होण्यास मदत करते, जे श्वास घेताना, अन्नातून किंवा प्रदूषित हवेद्वारे तुमच्या रक्तप्रवाहात जातात. पालेभाज्यांमधील क्लोरोफिल रक्त डिटॉक्स करण्यास मदत करते. अनेक अभ्यासातून दिसले आहे की क्रूसिफेरस भाज्यांमध्ये सल्फर संयुगे असतात जे रक्त डिटॉक्सिफाय करतात आणि जळजळ कमी करतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










