Fish : काट्यांमुळे मासे खात नाही? आता टेन्शन विसरा! शास्त्रज्ञांनी शोधली 'विना काट्यांची' खास माशाची जात

Last Updated:
प्रोटीन्स, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि विटामिन्सचा खजिना असलेले मासे मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी तर वरदानच आहेत.
1/9
रविवार असो वा एखादा खास बेत, मांसाहारी खवय्यांच्या ताटात माशांच्या फ्राय किंवा रश्याची जागा काही वेगळीच असते. चिकन आणि मटनपेक्षा मासे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानले जातात. प्रोटीन्स, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि विटामिन्सचा खजिना असलेले मासे मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी तर वरदानच आहेत.

advertisement
2/9
पण इतके फायदे असूनही अनेक लोक मासे खाण्यापासून लांब पळतात. याचं मुख्य कारण म्हणजे माशांमधील 'बारीक काटे'. घशात काटा अडकण्याची भीती इतकी असते की, अनेक पालक आपल्या लहान मुलांना मासे भरवायला घाबरतात. मात्र, आता तुमची ही भीती कायमची दूर होणार आहे. कारण शास्त्रज्ञांनी आता असा मासा विकसित केला आहे, ज्यामध्ये एकही बारीक काटा नसेल.

3/9
'ॲक्वाकल्चर' (Aquaculture) या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, चीनमधील शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंगच्या माध्यमातून एक खास मासा तयार केला आहे. चिनी विज्ञान अकादमीच्या संशोधकांनी CRISPR/Cas9 या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'केंडई' (Crucian Carp) माशाची एक नवीन प्रजाती विकसित केली आहे, ज्यामध्ये बारीक काटे पूर्णपणे गायब आहेत.

4/9
कसा तयार झाला हा 'काटेमुक्त' मासा?माशांच्या शरीरात बारीक काटे तयार होण्यासाठी 'RunX2b' नावाचा जीन कारणीभूत असतो. शास्त्रज्ञांनी 6 वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर या जीनमध्ये बदल केला. यामुळे माशाच्या वाढीदरम्यान त्यात बारीक काटे तयार होणे थांबले.

5/9
या संशोधनाची काही खास वैशिष्ट्ये:या नवीन जातीला 'Zhongke No. 6' असे नाव देण्यात आले आहे.
सामान्य केंडई माशामध्ये 80 पेक्षा जास्त बारीक काटे असतात, पण या नवीन माशामध्ये फक्त पाठीचा कणा (मुख्य हाड) आहे. वैज्ञानिकांच्या मते, या माशाची चव, सुगंध आणि त्यातील पोषक तत्वे अगदी नैसर्गिक माशांप्रमाणेच आहेत.
या संशोधनाची काही खास वैशिष्ट्ये:या नवीन जातीला 'Zhongke No. 6' असे नाव देण्यात आले आहे.सामान्य केंडई माशामध्ये 80 पेक्षा जास्त बारीक काटे असतात, पण या नवीन माशामध्ये फक्त पाठीचा कणा (मुख्य हाड) आहे. वैज्ञानिकांच्या मते, या माशाची चव, सुगंध आणि त्यातील पोषक तत्वे अगदी नैसर्गिक माशांप्रमाणेच आहेत.
advertisement
6/9
हा नवा मासा केवळ खाणाऱ्यांसाठीच नाही, तर पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. हे मासे सामान्य माशांच्या तुलनेत 25% वेगाने वाढतात.

7/9
यांना इतर माशांच्या तुलनेत कमी चारा लागतो, ज्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो.  हे मासे अधिक काळ जिवंत राहतात आणि त्यांच्यात आजारांशी लढण्याची क्षमता जास्त असते. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी या माशांना 'स्टेराइल' (वांझ) बनवण्यात आले आहे, जेणेकरून ते नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये जाऊन इतर जंगली माशांच्या प्रजातींमध्ये मिसळणार नाहीत.

8/9
भारतात कोणते मासे खावेत?हे 'जीन एडिटेड' मासे बाजारात येण्यास अजून थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत तुम्ही कमी काटे असलेले काही भारतीय मासे ट्राय करू शकता, जे चवीलाही उत्तम आहेत:
सुरमई (King Fish), पापलेट (Pomfret), मुशी (Milk shark) , काळा मासा, इ.
भारतात कोणते मासे खावेत?हे 'जीन एडिटेड' मासे बाजारात येण्यास अजून थोडा वेळ लागू शकतो. तोपर्यंत तुम्ही कमी काटे असलेले काही भारतीय मासे ट्राय करू शकता, जे चवीलाही उत्तम आहेत:सुरमई (King Fish), पापलेट (Pomfret), मुशी (Milk shark) , काळा मासा, इ.
advertisement
9/9
तुम्हालाही काट्यांच्या भीतीमुळे मासे खाणे सोडले असेल, तर विज्ञानाने शोधलेला हा पर्याय भविष्यात नक्कीच खवय्यांची चंगळ करणार आहे.

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement