Morning Routine : डायबिटीजवर नियंत्रण मिळवायचंय? मग रोज सकाळी पाण्यात मिसळून प्या ही 5 पानं
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
दरवर्षी जगभरात डायबिटीज हा गंभीर आजार होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असते. डायबिटीज वेळीच नियंत्रणात न ठेवल्यास त्याचे अनेक गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. तेव्हा डायबिटीज नियंत्रणात येण्यासाठी दररोज सकाळी ही 5 पान पाण्यात मिसळून खाल्ल्यास फायदा होईल.
कढीपत्ता : कढीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तज्ञांच्या सांगण्यानुसार, कढीपत्ता डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. कढीपत्त्यात फायबर मुबलक प्रमाणात आढळते आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चयापचय लवकर होत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्ही सकाळी ब्रश न करता पाण्यासोबत कढीपत्ता खाऊ शकता.
advertisement
तुळशीची पानं : तुळस ही एक अशी वनस्पती आहे, जिला आयुर्वेदिक महत्त्वासोबतच धार्मिक महत्त्व आहे. तुळशीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात जे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवतात. तुळशीमुळे आपल्याला संसर्ग टाळण्यासही मदत होते. जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर तुळशीची पाने उकळून त्याचे पाणी सकाळी लवकर प्या.
advertisement
इन्सुलिन वनस्पतीची पाने : डायबिटीजच्या रुग्णांसाठी इन्सुलिन हे रामबाण औषधापेक्षा कमी नाही. जेव्हा डायबिटीजची केस जुनी असते तेव्हा डॉक्टर रुग्णाला इन्सुलिनचे इंजेक्शन देतात. जर तुम्हाला डायबिटीजची सौम्य लक्षणे असतील तर तुम्ही इन्सुलिन वनस्पतीच्या पानांचे सेवन करू शकता. त्याची पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करतात.
advertisement
आंब्याची पाने : आंब्याच्या पानांमध्ये मॅंगीफेरिन एन्झाईम आढळते, ज्यामध्ये अल्फा ग्लुकोसिडेस रोखण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. हे दोन्ही आपल्या रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करतात. तेव्हा सकाळी उठल्यावर आंब्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते.
advertisement
पेरूची पाने : पेरू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु त्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म देखील अधिक आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, पेरूच्या पानांचा रस अल्फा ग्लुकोसिडेसची क्रिया रोखतो. हे एक प्रकारचे एंझाइम आहे. जे स्टार्च आणि इतर कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये खंडित करते. पेरूची पाने पाण्यात उकळून प्यायल्यास रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.