Soaked Methi Water Benefits: काय सांगता! ‘इतक्या’ आजारांवर फायदेशीर ठरू शकतं मेथी दाण्यांचं पाणी?

Last Updated:
Health Benefits of Soaked Methi water in Marathi: आरोग्यदायी मेथीचे अनेक फायदे आहेत. मेथी किंवा मेथी दाणे हे जितके आरोग्यासाठी फायद्याचे आहेत तितकंच रात्रभर मेथी दाणे भिजवलेलं पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. जाणून घेऊयात हिवाळ्यात मेथी दाण्यांचं पाणी पिण्याचे फायदे.
1/7
मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. याशिवाय मेथी दाण्यातले पाचक एन्झाईम्स् अन्न पचायला मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता अपचनाचा त्रास असलेल्यांनी मेथीचं पाणी पिणं फायद्याचं ठरतं.

advertisement
2/7
मेथीच्या दाण्यांचं पाणी प्यायल्याने शरीरातलं खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगलं कोलेस्टेरॉल वाढू लागतं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
मेथीच्या दाण्यांचं पाणी प्यायल्याने शरीरातलं खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगलं कोलेस्टेरॉल वाढू लागतं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं .
advertisement
3/7
मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचं पोषकतत्व आढळून येतं. जे सर्दी खोकल्यावर परिणामकारक आहे. चमचा मेथीचे दाणे गरम पाण्यात उकळून प्यायल्याने सर्दी-खोकला बरा व्हायला मदत होते.

4/7
मेथीच्या दाण्यांच्या पाण्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी मेथीच्या दाण्यांचं पाणी पिणं फायद्याचं ठरतं.

5/7
मेथीच्या दाण्यात असलेल्या फायबर्समुळे, सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यानं पोट भरलेलं राहतं. त्यामुळे भूक कमी लागून वजन नियंत्रणात राहायला किंवा कमी व्हायला मदत होते.

6/7
मेथीच्या दाण्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट किडनीचं आरोग्य सुधारायला मदत करतात. ज्यांना किडनीस्टोनचा त्रास आहे अशा व्यक्ती डॉक्टरांचा सल्ल्यानुसार मेथीचं पाणी पिऊ शकतात. यामुळे किडनी स्टोन गळून पडायला मदत होते.

7/7
त्वचेसाठी मेथीचं पाणी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेचे विकार किंवा अॅलर्जीचा त्रास दूर होतो. मेथीत असलेल्या अँटीएजिंग गुणधर्मांमुळे त्वचा तजेलदार दिसते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement