प्रत्येक पुणेकरानं खाल्लेच पाहिजेत असे 5 वडापाव, चुकूनही मिस करु नका!

Last Updated:
पुण्यातील वडापावनंही खवय्यांच्या मनात खास जागा केली आहे. त्यापैकीच 5 प्रसिद्ध वडापावची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.
1/7
वडापाव कोणाला आवडत नसेल असा व्यक्ती सापडणं फार कठीण, अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वडापाव खूप आवडतो. द इंडियन बर्गर म्हणून वडापावला जगभरात ओळखले जाते.

advertisement
2/7
 धावपळीच्या आयुष्यात अनेकदा भूक भागवण्यासाठी वडापावचा आस्वाद घेतला जातो. मुंबईत वेगवेगळ्या भागात वडापाव प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातील</a> वडापावनंही खवय्यांच्या मनात खास जागा केली आहे. त्यापैकीच 5 प्रसिद्ध वडापावची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.

3/7
गार्डन वडापाव : गार्डन वडापाव खाल्ला नसेल असा व्यक्ती पुण्यात सापडणं कठीण आहे. जे जे गार्डन, बट्टी स्ट्रीट, कॅम्प या ठिकाणी तब्बल 51 वर्षांपासून हा वडापाव या ठिकाणी मिळतो. इतके वर्ष होऊन देखील या वडापावची चव अजूनही जशीच्या तशीच आहे. त्यामुळे चोखंदळ पुणेकरांची या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

4/7
जोशी वडेवाले : पुण्यात आल्यानंतर तुम्हाला शहरातील विविध भागात जोशी वडापाव अशी दुकानं दिसतील. झणझणीत आणि गरमा गरम वडापावसाठी गेल्या 34 वर्षांपासून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आहे. जोशी वडापावलाचे 2 ऑक्टोबर 1989 रोजी पुण्यात बालगंधर्वसमोर जोशी वडेवाले पहिले दुकान सुरु झाले होते. हे ठिकाण पुणेकरांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक झाले आहे.

5/7
खत्री बंधू वडेवाले : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ एका छोट्याशा गाडीवर खत्री बंधूं वडेवाले आहेत. गेल्या 47 वर्षांपासून अनेक पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे खात्री बंधू वडेवाले, पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी येणारी मुलं देखील या ठिकाणी गर्दी करत असतात. अनेक वर्षांपासून या वडापावची हि चव अबाधित ठेवण्यात खत्री बंधू वडेवाले हे यशस्वी झाले आहेत .

6/7
 प्रभा विश्रांतीगृह : 1940 पासून पुणेकर हक्काने ज्या ठिकाणी नाश्ता अथवा जेवण करायला जातात असे ठिकाण म्हणजे प्रभा विश्रांती गृह. गेल्या 43 वर्षांपासून सुरु असलेल्या प्रभा विश्रांतीगृहमध्ये वडा खाण्यासाठी आजही खव्वयांची येथे गर्दी होते. कै.सरस्वतीबाई परांजपे यांनी शनिवार पेठेतील केसरी वाड्यासमोर हे विश्रांतीगृह सुरु केले होते. पुणेकर या ठिकाणी साबुदाना वडा आणि बडाटा वडा खाण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात .

7/7
नित्यानंद डोसा सेंटर : संध्याकाळी 5 वाजल्यानंतर पुण्यातील तुळशीबाग या ठिकाणी नित्यानंद डोसा सेंटर इथे वडापाव विक्री होण्यास सुरुवात होते. कामावरून घरी परतणाऱ्या पुणेकरांना थांबण्यासाठी हे मात्र हक्काचं ठिकाण आहे. गेल्या 36 वर्षांपासून या ठिकाणचा वडापाव हा प्रसिद्ध आहे. अवघ्या काही तासातच या ठिकाणचा वडापाव हा संपून जातो .

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement