Summer Tips: उकाडा भयंकर वाढतोय, ही फळं दररोज खा, जिवाला जरा बरं वाटेल

Last Updated:
आता उकाडा प्रचंड वाढलाय. दुपारी घराबाहेर पडलं की, अंगाची नुसती लाहीलाही होते. चालताना धाप लागते, डोकं दुखतं. अशा परिस्थितीत आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. यावर आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेणं हाच एकमेव उपाय आहे. सर्वात आधी आपल्या आहारात बदल करावा. शरिरात गारवा निर्माण होईल असे थंड पदार्थ खावे. याबाबत डॉ. प्रेम शरण काय सांगतात, पाहूया. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी / रायबरेली)
1/5
उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा आहारात हंगामी फळांचा समावेश असणं कधीही उत्तम. आता उन्हाच्या कडाक्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी खावी. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि फायबर असतं. ज्यामुळे शरिराला आतून गारवा मिळतो.

advertisement
2/5
उन्हाळ्यात लिंबूपाणी पिणं तर सर्वोत्तम. त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती भक्कम होते. शिवाय शरीर हायड्रेटेड राहतं. 

3/5
उष्ण वातावरणात शरिरात दही जाणं उपयुक्त मानलं जातं. त्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, इत्यादी पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे शरिरात केवळ गारवा निर्माण होत नाही, तर शरीर सुदृढ राहतं.

4/5
पुदिना आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. उन्हाळ्यात पुदिन्याच्या पानांचं सरबत बनवून प्यावं. पुदिन्याची चटणीही फायदेशीर असते, यामुळे शरीर आतून थंड राहतं.

5/5
कलिंगड चवीला छान गोड लागतंच, शिवाय ते रसाळही असतं. त्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. तसंच त्यातले व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स शरिरासाठी फायदेशीर असतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement