कंपनीतील नोकरी गेली अन् सुरू केलं पोळीभाजी केंद्र, 45 वर्षांनंतरही जेवणासाठी खवय्यांची झुंबड
- Published by:News18 Marathi
Last Updated:
डोंबिवलीत 45 वर्षांपूर्वी भारतातील सर्वात पहिलं पोळीभाजी केंद्र सुरू झालं. आजही याठिकाणी जेवणासाठी आवर्जून लोक येतात.
सध्याच्या काळात अनेक महिला विविध व्यवसायात यशस्वीपणे करियर करत आहेत. पण 1978 सालचा विचार केला तर, त्या काळात एका महिलेनं व्यवसायात उतरणं म्हणजे मोठं धाडसच होतं. हेच धाडस डोंबिवलीतील जयश्री कानिटकर यांनी करून दाखवलं. 1978 मध्ये विजयादशमी दिवशी त्यांनी व्यवसायत पाऊलं ठेवत 'त्रिमूर्ती' हे पोळीभाजी केंद्र सुरु केलं.
advertisement
advertisement
advertisement
1978 च्या काळात तसे मुंबईला बरीच लोकं नोकरी-व्यवसायासाठी येत होती, त्या लोकांना स्वस्तात आणि चांगल्या दर्जाचं घरगुती जेवण मिळावं या हेतूनं ही पोळी-भाजी केंद्राची कल्पना आमलात आणली गेली. अशाप्रकारे लोकांना घरगुती जेवण मिळतं गेलं आणि आजतागायत या पोळी-भाजी केंद्रात लोकांची तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त गर्दी पाहायला मिळते. अगदी रोजचे 300 ते 400 लोकांची वर्दळ इथे पाहायला मिळते.
advertisement
रोज 7 ते 8 भाज्या बनवल्या जातात. सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. रविवारी सकाळी डाळिंबी भाजी, छोले भाजी, पनीर भाजी असे स्पेशल मेन्यू ठेवले जातात. ज्याची किंमत 25 रुपयांपासून ते 35 रुपयांपर्यंत असते. तसेच डाळ, भात इथे प्रत्येकी फक्त 15 रुपयांना मिळतं. भाकरी एक नग 15 रुपयांना मिळते. तसेच आलू पराठा, तांदळाची भाकरी, चपाती, ज्वारी भाकरी, मेथी पराठा हे तर रोजच उपलब्ध असतं.
advertisement
advertisement
एवढंच नाही तर सकाळी याच पोळी-भाजी केंद्रावर तुम्हाला इडली, उपमा, पोहे, खिचडी, शिरा असा नाश्ताही मिळेल. ज्याची किंमत 20 ते 25 रुपयांपर्यंत आहे. तसेच वडापावचाही इथे वेगळा स्टॉल लागतो. 18 रुपयांमध्ये वडापाव मिळतो. अशाप्रकारे नाश्तापासून ते जेवणापर्यंत सगळेच खाद्यपदार्थ इथे अगदी परवडणाऱ्या किंमतीमध्ये मिळतात.
advertisement
advertisement
ज्या काळात मराठी माणूस स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत होता. त्यावेळी एका महिलेनं व्यवसायात उतरणं म्हणजे फारच कौतुकास्पद आहे. त्यामुळे जयश्री यांनी सुरु केलेलं हे पोळी-भाजी केंद्र पुढे खऱ्या अर्थानं महिलांना व्यवसायात उतरण्यासाठी प्रेरणादायी ठरतंय, असंच म्हणावं लागेल. (मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी)










