18 वर्षांची परंपरा, इथल्या पाणीपुरीची चव न्यारी, खाण्यासाठी खवय्यांची असते मोठी गर्दी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
जालना शहरात मिळणारी जय संताजी पाणीपुरी देखील अशीच खास आहे. गेल्या 18 वर्षांपसून काशिनाथ वामनराव गवळी हे हा स्टॉल चालवत असून इथं खवय्यांची मोठी गर्दी होते.
advertisement
advertisement
सायंकाळी 4 वाजल्यानंतर जालनाकरांची पाऊले आपसूक जय संताजी पाणीपुरी सेंटरकडे वळू लागतात. जालना शहरात 18 वर्षांपूर्वी काशिनाथ वामनराव गवळी यांनी छोटासा पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला गल्लोगल्ली फिरून ते पाणीपुरी विक्रीचं काम करायचे. दिवसभर भटकंती केल्यानंतर 200 ते 250 रुपयांचा व्यवसाय त्यांचा व्हायचा. परंतु व्यवसायाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिक कष्ट, यामुळे ते या व्यवसायात टिकून राहिले. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार पाणीपुरी मध्ये बदल करत गेले. आज त्यांची दिवसाला 3 ते 4 हजार रुपयांची कमाई या पाणीपुरी व्यवसायातून होते, असं गवळी सांगतात.
advertisement
रवा आणि मूग डाळीपासून चवदार पुरी घरीच बनवली जाते. तर जिरे, कोथिंबीर, पुदिना, शहाजीरा असे वेगवेगळे अस्सल मसाले घालून तयार केलेलं तिखट आणि चिंचेचं गोड पाणी खवय्यांना आकर्षित करतं. त्याचबरोबर पाणीपुरीसाठी वापरण्यात येणार आरो फिल्टर पाणी, स्टॉलवरची स्वच्छता आणि आपलेपणाची दोन शब्द यामुळे आपला ग्राहक वर्ग टिकून असल्याचं गवळी सांगतात.
advertisement
जालना शहरातील भाग्यनगर, देव मूर्ती, मोतीबाग, रेल्वे स्टेशन, मामा चौक यासारख्या परिसरातून लोक पाणीपुरी खाण्यासाठी या ठिकाणी येतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील खेडेगावांमधून देखील कामानिमित्त आलेले लोक आवर्जून या ठिकाणची पाणीपुरी खाऊनच घरी जातात. लग्न सराईच्या सीझनमध्ये अडीच ते तीन लाखांचे ऑर्डर्स देखील काशिनाथ गवळी यांना मिळतात.
advertisement
मागील 18 वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. ग्राहकांशी व्यवहार व्यवस्थित ठेवला. चांगल्या प्रतीचा दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना दिल्यास ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. आपली पाणीपुरी कशी आहे? हे ग्राहकच त्यांच्या तोंडून सांगतात. 15 रुपयांना पाणीपुरीची प्लेट विकतो. या व्यवसायातून दिवसाला 3 ते 4 हजारांचा नफा आरामात होतो, असं काशिनाथ गवळी यांनी सांगितलं.
advertisement