आटवलेले दूध अन् मसाले, तेलंगणातील रगडी चहा जालन्यात, खवय्यांची पसंती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
दूध आटवून बनवलेल्या अस्सल रगडीची चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जुना जालना शहरातील जिंदल कॅपिटलपाशी असलेल्या अण्णा रगडी आणि चहा स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता.
आपल्यापैकी अनेक जण चहा आणि कॉफीचे अस्सल चहाते असतात. तुम्ही देखील चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल तर जालन्यामध्ये रगडी चहा आणि कॉफी मिळतीये. दूध आटवून बनवलेल्या अस्सल रगडीची चहा आणि कॉफीचा आस्वाद घ्यायचा असेल तर जुना जालना शहरातील जिंदल कॅपिटलपाशी असलेल्या अण्णा रगडी आणि चहा स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता. इथे 15 रुपयांमध्ये रगडी कॉफी तर 10 रुपयांमध्ये दगडी चहा मिळतोय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या चहा कॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरण्यात येणारी रगडी 50 लिटर दूध आटवून आणि त्यामध्ये मसाले घालून तीस लिटर रगडी तयार होते. त्यानंतर या रगडीमध्ये रेगुलर आपण ज्या पद्धतीने चहा आणि कॉफी करतो त्याच पद्धतीने चहा आणि कॉफी तयार केली जाते. घट्ट रगडीमुळे चहा आणि कॉफीला विशेष अशी चव येत असल्याने जालना शहरातील नागरिकांच्या पसंतीस रगडी चहा आणि कॉफी उतरत आहे.
advertisement
advertisement