डॉक्टर विकतायेत जात्यावरचं पीठ, किलोला दीड हजारांचा भाव, असं काय आहे खास?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Food Business: कुटुंबाची साथ मिळाल्याने सोलापूरच्या महिला डॉक्टरने स्वत:चा माडग्याचे पीठ विक्रीचा बिझनेस सुरू केला आहे. घरगुती व्यवसायातून त्या चांगली कमाई करत आहेत.
एखाद्या महिलेनं ठरवलं तर कुटुंबाच्या साथीने ती स्वत:चं उद्योगविश्व उभारू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अनगरच्या डॉ. स्वाती थिटे होय. काळाच्या ओघात लोप पावत असणाऱ्या माडग्याची चव त्यांनी हजारो लोकांना चाखायला दिलीये. जात्यावर दळून तयार केलेल्या तिखट आणि गोड हुलग्याच्या माडग्याचा वसुंधरा ब्रँडला मोठी मागणी आहे.
advertisement
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे राहणाऱ्या डॉ. स्वाती थिटे गेल्या 4 वर्षापासून घरगुती माडगे बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. पारंपारिक पद्धतीने जात्यावर हुलगा दळून त्यांचे पीठ चुलीवर शिजवून माडगे बनवले जाते. हुलग्याच्या माडग्यामुळे कफ, वात आणि मेद कमी होतो. विशेषतः कणकण, सर्दी-पडसे यावर ते गुणकारी मानले जाते.
advertisement
माडगे बनविण्यासाठी एक किलो हुलगे स्वच्छ करून लोखंडी तव्यावर भाजले जातात. थंड झाल्यानंतर जात्यावर दळून त्याचे बारीक पीठ तयार करतात. हे पीठ चाळणीने चाळले जाते. तिखट माडग्यासाठी एक किलो हुलगा पीठ, 15 ग्रॅम तिखट, 7 ग्रॅम हळद, 15 ग्रॅम जिरेपूड, 15 ग्रॅम धनेपूड, 40 ग्रॅम सैंधव मीठ आणि 10 ग्रॅम ओवा मिसळून एकत्रित केले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement