मिठाचे असतात 5 प्रकार, जाणून घ्या कोणतं मीठ कोणत्या आजारावर लाभदायी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
रोजच्या जेवणाला मिठाशिवाय चव नसते. त्यामुळे रोजच्या आहारात चवीसाठी मिठाचा समावेश केला जातो. पण मीठ जास्त प्रमाणात खाणंही धोकादायक मानलं जातं. मिठाचे विविध 5 प्रकार आहेत. विशेष म्हणजे त्याचं आरोग्याच्या दृष्टीनं खास महत्त्व आहे.
मिठाचे 5 प्रकार असून आयुर्वेदिक दृष्ट्या प्रत्येक प्रकाराचं खास महत्त्व आहे. त्याचे आरोग्यासाठी विशेष फायदे असून विविध आजारांवर ते लाभदायी मानलं जातं. याबाबत हल्द्वानी येथील आयुर्वेदिक डॉक्टर विनय खुल्लर यांनी माहिती दिलीय.
advertisement
advertisement
काळं मीठ आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यात सल्फरचं प्रमाण जास्त असल्यानं पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानलं जातं. या मिठाचं दररोज सेवन केल्यानं बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच काळं मीठ वजन कमी करण्यास, बीपी नियंत्रित करण्यास आणि छातीत जळजळ कमी करण्यास मदत करतं.
advertisement
advertisement
गुलाबी मीठ हे हिमालयात आढळतं. हे मीठ चवीला थोडं गोड असतं. त्याचं दररोज मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. या मिठाचं सेवन केल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते. ज्यामुळे डिहायड्रेशन सारख्या समस्या टाळता येतात. तसेच हे मीठ मेंदूतील सेरोटोनिन हार्मोन्स वाढवून तणावापासून आराम देते. तसेच त्वचा स्वच्छ ठेवण्यासही मदत होते.
advertisement
advertisement