Hair care tips: कोंड्यावर घरगुती उपाय, कधीच जमणार नाही डोक्यावर पांढरा थर!

Last Updated:
Hair care tips: केस आणि त्वचेची काळजी घेणं आजकाल प्रचंड अवघड झालंय. एकीकडे प्रदूषण वाढतंय, तर दुसरीकडे आपली जीवनशैली अधिक धावपळीची होतेय. केसगळती ही तर सध्या सामान्य समस्या झालीच आहे, शिवाय आहेत ते केस सुदृढ ठेवणंही कठीण झालंय. परंतु काही घरगुती उपायांनी आपण नक्कीच हेल्थी आणि सुंदर केस मिळवू शकता. आज आपण केसातील कोंड्यावर काही रामबाण उपाय जाणून घेणार आहोत. (ओम प्रकाश निरंजन, प्रतिनिधी)
1/5
डॉ. प्रभात कुमार यांनी सांगितलं की, केसात कोंडा होणं सामान्य आहे. परंतु हा कोंडा जाता जात नाही. त्यासाठी केसांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. ओल्या केसांमध्ये तेल लावल्यास कोंडा होऊ शकतो.

advertisement
2/5
एखाद्या व्यक्तीच्या केसात कोंडा असेल आणि तिचा कंगवा किंवा टॉवेल आपण वापरला, तर त्यामुळे आपल्या डोक्यातही कोंडा होऊ शकतो. परंतु काही घरगुती उपायांनी आपण केसातील कोंडा पूर्णपणे घालवू शकतो.

3/5
डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही जे नारळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरता, त्यात कापुराचा तुकडा घालून तेल काहीवेळासाठी तसंच ठेवावं. त्यानंतर या तेलानं डोक्यावर छान मालिश करावी. यामुळे कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

4/5
डॉ. प्रभात कुमार यांनी सांगितलं की, तेलात कापूर मिसळून डोक्यावर लावल्यास डोक्यावरील खाज कमी होते. तसंच स्कॅल्पवर पांढरा थर जमा होत नाही. त्याचबरोबर कोरफडाचा गर वापरूनही आपण केसातील कोंडा दूर करू शकतो.

5/5
आठवड्यातून 2 ते 3 दिवस ताजा कोरफड गर डोक्यावर व्यवस्थित लावून घ्यावा. 15 ते 20 मिनिटं गर तसाच राहूद्या, मग केस पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. यामुळे कोंड्यापासून मुक्ती मिळू शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement