दररोज नेमकी किती तासांची झोप हवी? जे आजी सांगायची तेच विज्ञान सांगतं!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अमेरिकेतील एका संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्तीने 24 तासांपैकी 5 तास शरिराची हालचाल करायलाच हवी आणि 8 तास पूर्ण झोप घ्यायलाच हवी. तरच सुदृढ आयुष्य जगता येईल. याबाबत झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या रिम्स रुग्णालयातील डॉक्टर जेके मित्र यांनी माहिती दिली आहे. (शिखा श्रेया, प्रतिनिधी / रांची)
8 तासांची झोप हवीच! : डॉक्टर सांगतात की, जे आपले पूर्वज सांगायचे तेच विज्ञानही सांगतं. झोप पूर्ण झाली, शरिराला व्यायाम मिळाला तरच मेटाबॉलिज्म स्ट्राँग राहतं. 18 वर्षांवरील सर्वांना 6 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. जर झोप पूर्ण झाली नाही, तर दिवसभर मन आणि मेंदू तणावात राहतो. निगेटिव्ह भावना निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याच कामात आपल्याला आपले 100 टक्के देता येत नाहीत. शरिरात आळस संचारलाय असं वाटतं. त्यामुळे एखाद्या कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येत नाही.
advertisement
advertisement
जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर सलग 8-9 तास एका जागी बसून राहणंही तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. कॅलरी बर्न होणार नाहीत, शिवाय सगळी चरबी यकृताजवळ जमा होईल. त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो. तुम्ही सलग 6 तास बसून काम करू शकता, परंतु त्यातही दर तासाला 5-10 मिनिटांचा ब्रेक घेऊन शरिराची हालचाल करा.
advertisement
advertisement