उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? ‘हे’ करा लगेच उपाय, चेहरा राहील फ्रेश

Last Updated:
उन्हाळ्यात तेलकट त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यास त्यातून त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर उन्हामुळे त्वचा लाल होणे ही सुद्धा उन्हाळ्यात निर्माण होणारी एक समस्या आहे. त्यामुळे तेलकट त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
1/7
 उन्हाळ्यात उष्णता आणि उकाडा यामुळे अनेकांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात पिंपल्सची समस्या वाढण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात तेलकट त्वचेची व्यवस्थित काळजी न घेतल्यास त्यातून त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे या समस्या निर्माण होतात.

advertisement
2/7
त्याचबरोबर उन्हामुळे त्वचा लाल होणे ही सुद्धा उन्हाळ्यात निर्माण होणारी एक समस्या आहे. त्यामुळे तेलकट त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी? याबाबत अमरावतीतील डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिली आहे.

3/7
त्वचेचा प्रकार माहिती असावा : प्रत्येक ऋतुमध्ये त्वचेची काळजी ही वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. काळजी घेताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या त्वचेचा प्रकार ओळखणे. कारण आपल्याला त्वचेचा प्रकार माहीत नसेल तर योग्य ट्रीटमेंट आपण घेऊ शकत नाही. त्याचबरोबर त्वचेचा प्रकार माहीत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही घरगुती उपाय करून बघायचे नाही, असे डॉ. अनुराधा सांगतात.

4/7
तेलकट त्वचेसाठी काय करावं? तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्हाला ऑईल फ्री आणि ग्लिसरीन फ्री प्रॉडक्ट तुमच्या त्वचेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे लागेल. तेलकट त्वचेला उन्हाळ्यात सुद्धा मॉइश्चरायझरची आवश्यकता असते. कारण उन्हाळ्यात तेलकट त्वचा जास्त ऑईल सिक्रेट करते.

5/7
त्यामुळे चेहरा चिपचिप आणि काळपट दिसायला लागतो. त्याचबरोबर फेसवॉश सुद्धा महत्वाचा आहे. उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी ग्लायकोलिक ऍसिड आणि सेलिसिलिक ऍसिड असणारे फेस वॉश तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता.

6/7
सनस्क्रीनव वापरायचं का? उन्हाळ्यात सनस्क्रीन सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्वचेचा प्रकार ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने उन्हाळ्यासाठी एक सनस्क्रीन घ्या. सनस्क्रीन किती महाग आहे यावर ते महत्वाचे नाही तर तुमच्या त्वचेला कोणते सुट होते ते महत्वाचे आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तेलकट त्वचेसाठी सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. दिवसभर सनस्क्रीन राहत नाही. ते दर 3 तासाने त्वचेवर अप्लाय करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वारंवार थंड पाण्याने चेहरा धुणे देखील तितकेच महत्वाचे आहे, असेही डॉक्टर सांगतात.

7/7
दरम्यान, उन्हाळ्यात त्वचेला खाज सुटणे ही समस्या खूप जोर करते. त्यामुळे असे काही आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असेही डॉक्टर अनुराधा सांगतात.

BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement