Health Tips: पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणं तुमच्यासाठी धोकादायक, पायांना होतो हा गंभीर आजार!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पाय जर सतत पाण्यात राहत असेल तर पायाला खाज सुटणे, बारीक पुरळ येणे, पायातून दुर्गंधी येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या उद्भवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement
पावसाळ्यात चिखलामुळे होणाऱ्या समस्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसात किंवा चिखलात भिजलेले पाय जर वेळेवर स्वच्छ नाही केले गेले, तर त्यातून त्वचेचे विविध विकार होऊ शकतात. पावसाळ्यात जर पाय सतत ओलसर राहत असेल, तर या ओलसरपणामुळे त्वचेला हवा मिळत नाही आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होते.
advertisement
advertisement
1. पायाची निगा राखणे पावसात भिजल्यानंतर पाय त्वरित साबणाने धुवून कोरडे करावेत. ओलसर बूट किंवा मोजे पुन्हा वापरू नयेत. शक्य असल्यास चप्पल किंवा सँडल्स वापरून पाय हवेशीर ठेवावेत. 2. फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ करून अँटी-फंगल पावडर वापरावी. जर खाज, रॅशेस, किंवा खवखव जाणवत असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
3. योग्य प्रकारच्या चप्पल वापरणे पावसाळ्यात पाणी साचलेल्या भागातून दररोज जावे लागत असल्यास गमबूट वापरणे सुरक्षित ठरू शकते. चिखलामधून चालताना बंद बूट टाळावेत, कारण त्यात ओलसरपणा अधिक काळ टिकून राहतो. 4. इम्युनिटी मजबूत ठेवणे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या लक्षणांसाठी वेळीच उपचार घेणे. संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
advertisement
त्यामुळे कोणतेही आजार जास्त काळ राहत नाहीत. पावसाळ्यात चिखल आणि ओलसरपणा टाळणे कठीण असले तरी योग्य काळजी घेतल्यास त्वचेसंबंधी त्रास टाळता येतो. पाय स्वच्छ ठेवणे, हवेशीर चप्पल वापरणे, अँटी-फंगल उपाय करणे आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. पायातील किरकोळ त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.