वंध्यत्व अन् नपुंसकत्व होणार दूर, या रोपाच्या मदतीनं पुरुष वाढवू शकतात आपली शक्ती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
विविध प्रकारच्या वनस्पती या आयुर्वेदात महत्त्वपूर्ण मानल्या गेल्या आहेत. यामध्ये एका वनस्पतीचे खूप महत्त्व आहे. या वनस्पतीचा वापर केल्याने शरीराला अनेक घातक आजारांपासून वाचवता येते. ही औषधी वनस्पती अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ही वनस्पती कोणती आहे, याचे काय फायदे आहेत, हे जाणून घेऊयात.
उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील वन अनुसंधान केंद्राचे वन क्षेत्राधिकारी मदन सिंह बिष्ट यांनी सांगितले की, अश्वगंधा ही एक प्राचीन आणि महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. अनेक प्रक्रियांमध्ये अश्वगंधाचा उपयोग होतो. शरीराच्या प्रतिकारशक्तीला फायदा होण्याच्या क्षमतेमुळे, अश्वगंधाला भारतीय जिनसेंग असेही म्हणतात.
advertisement
advertisement
पुरुषांमध्ये शीघ्रपतन व्यतिरिक्त शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या देखील अनेकदा दिसून येते. ज्या लोकांना हा त्रास आहे, त्यांनी अश्वगंधाचे सेवन नक्की करायला हवे. अश्वगंधा रक्तदाबालाही नियंत्रित ठेवते. चिंताग्रस्त असतनाही त्यावर लढण्यासाठीही अश्वगंधा उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन केल्यास मानसिक शक्ती वाढते.
advertisement
advertisement