Skin Care: तुमच्याही घरी असेल हा पाढंरा जादूई खडा, चेहरा उजळेल अन् सुरकुत्याही होतील गायब!

Last Updated:
Skin Care: पांढऱ्या रंगाचा एक चमचमणारा दगड किंवा खडा पूर्वी घराघरात असायचा. हाच खडा त्वचेच्या अनेक समस्यांवर देखील लाभदायी मानला जातो.
1/9
आपल्याकडे पूर्वापार आयुर्वेदाला महत्त्व असून घराघरात आयुर्वेदिक वनस्पती आणि इतर वस्तू असायच्या. पांढऱ्या रंगाचा एक चमचमणारा दगड किंवा खडा देखील पूर्वी घराघरात असायचा. पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणी आलं की हा एक खडा त्यावर फिरायला जायचा आणि काही क्षणात गाळ थेट तळ गाठायचा. हा जादूई खडा म्हणजे तुरटी होय.

advertisement
2/9
तुरटीचा वापर केवळ पाणी स्वच्छ करण्यासाठीच होतो असे नव्हे तर या तुरटीच्या खड्याचे अनेक फायदे आहेत. स्किन आणि फेस केअरसाठी तर हा खडा बहुगुणी मानला जातो. इंग्रजीत Alum आणि हिंदीत फिटकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुरटीचा बऱ्याच ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये वापर केला जातो. ब्युटीशियन शुमिता कर यांनी तुरटीचे काही जादूई फायदे Local18 ला सांगितले.

3/9
पिंपल्स आणि मुरुम यांवर रामबाण : तुरटीत अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्मेटरी गुणधर्म असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुम कमी करण्यास ते उपयुक्त असतात. त्वचेची छिद्रे साफ होऊन आणि त्यामध्ये जमा होणारी घाण आणि तेल काढून टाकली जाते. त्यामुळे पिंपल्सची समस्या नियंत्रित होण्यास मदत होते.

4/9
स्किन टायटनिंग : तुरटीच्या वापरामुळे त्वचेचा घट्टपणा वाढतो. त्वचेची उघडी छिद्रं संकुचित करण्यास मदत करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. त्वचेला टोन आणि मजबूत करण्यासाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

5/9
टॅनिंग आणि काळे डाग: त्वचेला टॅनिंग झालं असेल आणि गडद डाग किंवा पिगमेंटेशन असेल तर ते कमी करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तुरटीच्या नियमित वापराने चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि त्वचेवरचे काळे डाग हळूहळू फिकट होतात.

6/9
त्वचेच्या संसर्गापासून बचाव: तुरटीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचे जंतूसंसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. तुरटी बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट करते आणि त्यामुळेच त्वचेच्या समस्यांचा धोका कमी होतो.

7/9
दाढी केल्यानंतर वापर : तुरटी त्वचेवरील कोणतीही जखम किंवा स्क्रॅच त्वरीत बरे करण्यास मदत करते आणि त्वचेला थंडावा देते. त्यामुळे दाढी केल्यानंतरही तुरटीचा वापर सर्रास केला जातो.

8/9
तुरटी वापरण्यास अतिशय सोपी आहे. तुरटीचा एक लहान खडा पाण्यात विरघळवून चेहऱ्यावर लावता येतो. त्यानंतर 15 मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही प्रक्रिया केल्यास त्वचेची चमक वाढते आणि अनेक समस्या दूर होतात.

9/9
टीप: तुरटीबाबत ही सामान्य माहिती आहे व्यक्तिगत सल्ला नाही. कोणत्याही नवीन उत्पादनाचा किंवा घरगुती वस्तूचा वापर करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement