भेंडी खाऊन छान सडपातळ होऊ शकतं शरीर! वजनासाठी ही भाजी लय भारी

Last Updated:
रोजच्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश असायला हवा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. भाज्यांमधून शरिराला विविध पोषक तत्त्व मिळतात. आरोग्य सुदृढ राहण्यास मदत मिळते.
1/5
भेंडी तर आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. डॉ. राजू कच्छप सांगतात की, भेंडीत व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरसह अनेक पौष्टिक तत्त्व भरभरून असतात. भेंडीमुळे विशेषतः पोट व्यवस्थित साफ होतं.
भेंडी तर आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. डॉ. राजू कच्छप सांगतात की, भेंडीत व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरसह अनेक पौष्टिक तत्त्व भरभरून असतात. भेंडीमुळे विशेषतः पोट व्यवस्थित साफ होतं.
advertisement
2/5
पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यास लगेच पोटाचे आजार जडू शकतात. अशावेळी घरचंच जेवण जेवण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. त्यातही भेंडीची भाजी प्रामुख्यानं खावी. यात फायबरचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. शिवाय इतर आजारांपासूनही आरोग्याचं रक्षण होतं.

3/5
भेंडीत कार्ब्स आणि अँटी-ओबेसिटी गुणधर्मही चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचासुद्धा तुकतुकीत आणि तजेलदार होते.
भेंडीत कार्ब्स आणि अँटी-ओबेसिटी गुणधर्मही चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचासुद्धा तुकतुकीत आणि तजेलदार होते.
advertisement
4/5
 डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडी खाल्ल्याने ला झाला तर फायदाच होतो, पण कोणतंही नुकसान या भाजीमुळे होत नाहीत. तसंच ज्यांचं काम सतत स्क्रीनसमोर असतं त्यांनी भेंडी आवर्जून खावी, कारण भेंडीमुळे डोळेही  राहतात, असं डॉक्टर सांगतात.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडी खाल्ल्याने आरोग्याला झाला तर फायदाच होतो, पण कोणतंही नुकसान या भाजीमुळे होत नाहीत. तसंच ज्यांचं काम सतत स्क्रीनसमोर असतं त्यांनी भेंडी आवर्जून खावी, कारण भेंडीमुळे डोळेही निरोगी राहतात, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
5/5
 सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement