Health Tips: अपचन होईल दूर, थकवा नाही जाणवणार, पावसाळ्यात हे फळ खाण्याचे गुणकारी फायदे
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
लहानपणीच्या आठवणींमध्ये या फळाला खास स्थान असलं, तरी आजही त्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता, पावसाळ्यात करवंदाचं सेवन करणं अत्यंत उपयुक्त ठरतं.
पावसाळा सुरू झाला की बाजारपेठांमध्ये विविध हंगामी फळांची रेलचेल पाहायला मिळते. त्यातच काळसर-जांभळ्या रंगाचं, लहानसं पण गुणकारी फळ म्हणजे ‘करवंद’. लहानपणीच्या आठवणींमध्ये या फळाला खास स्थान असलं, तरी आजही त्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता, पावसाळ्यात करवंदाचं सेवन करणं अत्यंत उपयुक्त ठरतं. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे अपचन, सर्दी-खोकला, थकवा यांसारख्या समस्या वाढतात. अशा वेळी करवंदाचं सेवन केल्यास पाचनक्रिया सुधारते, रक्तशुद्धी होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. यामधील अॅस्ट्रिंजंट गुणधर्म तोंड येणं, हिरड्यांमध्ये सूज येणं यावर उपयोगी ठरतात. त्यामुळे आयुर्वेदातही करवंदाला महत्त्व आहे.
advertisement
advertisement
advertisement