advertisement

हिवाळ्यात सुपरफूड! हाडे होतील मजबूत अन् कोलेस्ट्रॉल होईल कमी, पाहा बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे

Last Updated:
ऋतूमध्ये शरीराच्या गरजेनुसार अधिक पोषणमूल्ये देणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला जातो. बाजरीची भाकरी हा असाच एक आरोग्यदायी आणि पचनसुलभ पदार्थ आहे.
1/7
हिवाळ्याचा ऋतू म्हणजे आरोग्याला पोषक आणि पचनासाठी अनुकूल असलेला काळ. याच ऋतूमध्ये शरीराच्या गरजेनुसार अधिक पोषणमूल्ये देणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला जातो. बाजरीची भाकरी हा असाच एक आरोग्यदायी आणि पचनसुलभ पदार्थ आहे.

2/7
बाजरीमध्ये भरपूर फायबर, कमी कॅलरीज, आणि आवश्यक पोषक तत्वे असल्याने तिला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीची मागणी ऊसतोड मजुरांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढते. बाजरीची भाकरी खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत? याबद्दच आहार तज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

3/7
बाजरीमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. बाजरीच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

4/7
बाजरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा लो ग्लायसेमिक इंडेक्स, जो रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी बाजरीचा समावेश आहारात केल्याने मोठा फायदा होतो, असं डॉ. अमृता कुलकर्णी सांगतात.

5/7
बाजरीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती पचनास हलकी असते. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता, पोटफुगी यांसारख्या त्रासांवरही बाजरीचा सकारात्मक परिणाम होतो, असं डॉ. अमृता कुलकर्णी सांगतात.

6/7
बाजरीच्या या फायद्यांमुळे हिवाळ्यात तिचा समावेश आहारात नक्कीच करायला हवा. ती आरोग्यासाठी लाभदायक असूनही चविष्ट देखील आहे.

7/7
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement