Health Tips : निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात कसा असावा आहार? फॉलो करा 'या' टिप्स
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिवाळ्याच्या दिवसात आपण आपल्या शरीराची काळजी घेत असतो. या दिवसात आपल्या आहाराकडे देखील लक्ष देणे गरजेचे असते.
advertisement
advertisement
खरंतर हिवाळ्यामध्ये बाहेरच्या थंड वातावरणामुळे बाह्य अग्नी शरीरात कोंडला जाऊन जठराग्नी वाढतो. त्यामुळेच या दिवसांत भूकही जास्त लागते आणि पचायला जड असलेले काही पदार्थ देखील सहज पचतात. मात्र यामुळेच बऱ्याचदा आपल्याकडून नको त्या पदार्थांचे अति सेवन केले जाते. आणि याचा परिणाम सर्वात आधी आपल्या पचनसंस्थेवर होतो, असे अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
advertisement
पचनसंस्थेवर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांच्या अतिसेवनामुळे हिवाळ्याच्या दिवसांत बऱ्याचदा जठराचे, आतड्याबाबत समस्या जाणवू लागतात. यामध्ये अपचन, जुलाब किंवा अतिसार, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्यांचा समावेश आहे. या सर्व समस्या हिवाळ्याच्या दिवसात अयोग्य आहारामुळेच आपले डोकेवर काढत असतात, असे अमृता सांगतात.
advertisement
हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या, कडधान्ये, तेलबिया, अशा घटकांचा समावेश असायला हवा. त्याच बरोबर हिवाळ्यात तीळ, शेंगदाणे, बाजरी यांचा देखील सेवन केले गेले पाहिजे. तर अती तिखट, अती मसालेदार, अती थंड पदार्थ, जंक फूड या सगळ्या गोष्टीही टाळायला हव्यात. या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आपण नक्कीच योग्य आहार घेऊन आपला हिवाळा सुखकारक करू शकतो, असेही अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे
advertisement
advertisement


