'या' समस्या असलेल्या व्यक्तींनी नारळपाणी पिऊ नये; जाणून घ्या सविस्तर माहिती
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
सध्या उन्हाळा सुरू असून वातावरणातील उष्माही फार वाढला आहे. अशा हवामानामध्ये शरीर हायड्रेट ठेवण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत हेल्दी ड्रिंक्स पिण्याला प्राधान्य दिलं जातं. हेल्दी ड्रिंक्समध्ये नारळपाण्याचाही समावेश होतो. हे एक असं नैसर्गिक पेय आहे ज्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्वचेचं आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील नारळ पाणी प्रभावी आहे. आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांच्या मते, नारळाच्या पाण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे अनेक तोटेही आहेत. काही आजारांमध्ये नारळपाणी प्यायल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
किडनीवर परिणाम: जास्त प्रमाणात नारळपाणी प्यायल्याने वारंवार लघवीला होते. किडनी आपल्या शरीरातील विषारी द्रव्यं लघवीच्या माध्यमातून बाहेर काढतात. पण, शरीरात टॉक्सिन नसेल तर किडनीवर दबाव येतो आणि किडनीचं आरोग्य बिघडतं. ज्यांना किडनीशी संबंधित समस्या किंवा लघवीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी नारळपाणी पिऊ नये.
advertisement
advertisement