Red Banana Benefits: पोषकतत्त्वांचा खजिना आहेत लाल केळी, नियमितपणे खाल्ल्याने होतील अनेक फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of Red Banana in Marathi : केळी हे आपल्यापैकी अनेकांच्या आहारातलं एक महत्त्वाचं फळ. झाडावर लागलेली कच्ची म्हणजेच हिरवीगार केळी आणि बाजारात विकायला आलेली पिवळी केळी आपण नेहमी पाहतो. मात्र सध्या बाजारात लाल रंगाची केळी सुद्धा उपलब्ध होऊ लागली आहेत. ही केळी बाहेरून लाल रंगाची जरी असली तरीही आतून ती पिवळीच असतात. या केळ्यांना ढाका केळी असंही म्हणतात. ही लाल केळी पिवळ्या केळ्यांइतकी गोड जरी नसली तरीही, पिवळ्या केळ्यांच्या तुलनेत ती आरोग्यासाठी प्रचंड फायद्याची आहेत. जाणून घेऊयात लाल केळ्यांचे 7 आश्चर्यकारक फायदे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement