Kiwi fruit benefits: ‘या’ फळाचे आहेत इतके फायदे, आठवड्यातून दोनदा जरी खाल्लं तरीही वर्षभर राहाल निरोगी

Last Updated:
Health benefits Kiwi fruit In Marathi: आपलं आरोग्य चांगलं ठेवून निरोगी राहायचं असेल तर सकस, पौष्टिक आहारासोबतच फळं खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ आपल्याला देतात. फळांमध्ये असलेल्या विविध पोषकतत्त्वांमुळे विविध आजारांना दूर ठेवता येतं. फळांमध्ये लिंबूवर्गीय फळे अधिक फायदेशीर मानली जातात. असंच एक फळ म्हणजे किवी. जाणून घेऊयात किवी फळ खाण्याचे फायदे
1/9
किवी फळाचं मूळ हे चीनचं असल्यामुळे या फळाचं मूळ नाव यांग टाओ असं होतं. मात्र जेव्हा न्यूझीलंडमध्ये किवीचं उत्पादन घेतलं गेलं तेव्हा किवीचं नामकरण ‘चायनिज गुसबेरी’ असं करण्यात आलं.

advertisement
2/9
किवी हे भारतातलं फळ जरी नसलं तरीही त्यात असलेल्या पोषकतत्वांमुळे आता ते भारतीयांच्या आहारातलं एक महत्त्वाचं फळ झालं आहे.

3/9
चिकू सारख्या दिसणाऱ्या आणि अंड्याच्या आकाराच्या या लहानशा फळात भरपूर फायबर्स, जीवनसत्त्वं, खनिजं, अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात.

4/9
किवीमध्ये प्रीबायोटिक्स असतात, ज्यामुळे चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होऊन आतड्यांचं कार्य सुधारतं आणि अपचन, बद्धकोष्ठतासारख्या आजारांपासून आराम मिळतो.

5/9
किवी फळात जास्त फायबर्स आणि कमी कॅलरीज असतात. कमी कॅलरीजमुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो आणि फायबर्समुळे पोट दीर्घकाळ भरलेलं  राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किवी खाणं फायदेशीर ठरू शकतं.

6/9
किवी हे लिंबूवर्गीय फळ असल्याने ते ‘व्हिटॅमिन सी’नं समृद्ध आहे. हंगामी आजारांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ फायद्याचं ठरतं. त्यामुळ किवी खाल्ल्याने संक्रामित आजारांचा धोका टाळता येतो.

7/9
शरीरात लोह शोषून घेऊन रक्तवाढीसाठी देखील किवी फायद्याचं आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरारत रक्ताची कमतरता आहे, किंवा ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे, अशा व्यक्तीसाठी किवी खाणं फायद्याचं ठरू शकतं.

8/9
किवीमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. पोटॅशियम रक्तदाबमुळे रक्तदाब नियंत्रित होऊन हृदयरोगाचा धोका टाळता येतो.

9/9
किवीमध्ये व्हिटॅमिन के देखील असतं, हाडांसाठी फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन के मुळे हाडांची घनता वाढून हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडं मजबूत होतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement