Food Poisoning : पावसाळ्यात वाढलंय फूड पॉयझनिंगचं प्रमाण? अशी घ्या काळजी
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पावसाळ्यात फूड पॉयझनिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ होते. अन्नातील विषबाधेने दरवर्षी अनेकजणांचा जीव सुद्धा जातो. त्यामुळे पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देणे महत्वाचे असते. तेव्हा फूड पॉयझनिंग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी आणि फूड पॉयझनिंगची लक्षण कोणती याविषयी जाणून घेऊयात.
अन्नातून विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंग झाल्यावर त्याचा लगेचच परिणाम दिसून येत नाही. अन्न खाल्ल्यावर लगेचच विषबाधेची लक्षण दिसून येतात असे नाही. तुम्ही कोणत्या प्रकारचं अन्न खाल्लं आहे यावर ते अवलंबून असते. सर्व खाद्यपदार्थांममुळे विविध जीवाणू तयार होतात ज्याचा परिणाम 12 तासांपासून ते 70 दिवसांनंतर होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








