Papaya Side Effects : हेल्दी आहे म्हणून पपई खाण्याची चूक करु नका, 'या' लोकांसाठी विषापेक्षा कमी नाही हे फळ

Last Updated:
पपईमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ती पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचा उजळ ठेवते. पण तुम्हाला माहितीय का? पपई सर्वांसाठी फायदेशीर नसते. काही लोकांनी ती खाल्ल्यास आरोग्यावर उलट परिणाम करते.
1/9
फळांमध्ये पपई म्हणजे आरोग्याचा खजिना मानला जातो. तिचा रंग, गोडसर चव आणि सहज पचणारे गुणधर्म यामुळे ती प्रत्येक घरात आवडती असते. पपईमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ती पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचा उजळ ठेवते. पण तुम्हाला माहितीय का? पपई सर्वांसाठी फायदेशीर नसते. काही लोकांनी ती खाल्ल्यास आरोग्यावर उलट परिणाम करते.

advertisement
2/9
न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्या मते, कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते. कारण अशा पपईत लेटेक्स नावाचा नैसर्गिक घटक असतो, जो गर्भाशयात आकुंचन निर्माण करू शकतो. यामुळे गर्भपात किंवा अकाली प्रसवाचा धोका वाढतो. म्हणून गर्भवती महिलांनी कच्ची पपई पूर्णपणे टाळावी.

3/9
पिकलेली पपई खायची असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. काही वेळा पिकलेली पपईही संवेदनशील शरीरावर परिणाम करू शकते.

4/9
पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी सावध राहावेपपईत फायबर भरपूर असतो, जो सामान्यतः पचनासाठी चांगला असतो. पण इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS), वारंवार सैल शौच किंवा गॅसची समस्या असलेल्यांनी पपई टाळावी. कारण फायबरचे जास्त प्रमाण उलट पोटदुखी, फुगलेपणा किंवा अतिसार वाढवू शकते.

5/9
मधुमेह असलेल्यांनी मर्यादेत खावेपपईचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असला तरी त्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे डायबिटीज असलेल्यांनी पपई मर्यादित प्रमाणात खावी. जास्त खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

6/9
त्वचेच्या ऍलर्जी असलेल्यांनी खबरदारी घ्यावीकाही लोकांना पपई खाल्ल्यानंतर खाज, लालसरपणा, पुरळ किंवा सूज यासारख्या त्वचाविकारांचा अनुभव येतो. हे पपेन नावाच्या एन्झाइममुळे होते. त्यामुळे अशा लक्षणं दिसल्यास पपई खाणं थांबवावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
त्वचेच्या ऍलर्जी असलेल्यांनी खबरदारी घ्यावी काही लोकांना पपई खाल्ल्यानंतर खाज, लालसरपणा, पुरळ किंवा सूज यासारख्या त्वचाविकारांचा अनुभव येतो. हे पपेन नावाच्या एन्झाइममुळे होते. त्यामुळे अशा लक्षणं दिसल्यास पपई खाणं थांबवावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
7/9
औषध घेत असलेल्या लोकांनी विचारपूर्वक खावेथायरॉईड किंवा रक्त पातळ करणारी औषधं घेणाऱ्या लोकांनीही पपई सावधगिरीने खावी. कारण पपईतील काही घटक औषधांच्या प्रभावावर परिणाम करू शकतात. त्यामुळे नियमित औषध घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच.

8/9
पपई आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. पण प्रत्येकासाठी नाही. गर्भवती महिला, पचनाच्या समस्या असलेले किंवा विशिष्ट औषधं घेणारे लोकांनी ती खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ल्यास पपई शरीराला शक्ती, सौंदर्य आणि आरोग्य देते; पण चुकीच्या प्रकारे घेतल्यास ती औषधाऐवजी विषही ठरू शकते.

9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement