Chitrangi Daane Bhaji: विदर्भ स्पेशल चित्रांगी दाण्याची भाजी, खायला अतिशय पौष्टिक, घरीच बनवा सोप्या पद्धतीने
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
लष्करी वालाचे दाणे अतिशय पौष्टिक असतात. याच दाण्यांना चित्रांगी दाणे, दूध मोगऱ्याचे दाणे या नावानेही ओळखले जाते.
अमरावती जिल्ह्यात वरूड तालुक्यातील काही गावांमध्ये लष्करी वालाचे उत्पादन घेतले जाते. लष्करी वालाचे दाणे अतिशय पौष्टिक असतात. याच दाण्यांना चित्रांगी दाणे, दूध मोगऱ्याचे दाणे या नावानेही ओळखले जाते. वरूड तालुक्यातील प्रत्येक घरी वर्षभरातून एकदा तरी या दाण्याची भाजी बनवली जाते. चित्रांगी दाण्याची भाजी कशी बनवायची? त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी सांगितली आहे.
advertisement
advertisement
चित्रांगी दाण्याची भाजी बनवण्याची कृती: सर्वात आधी दाणे 5 ते 6 तास भिजवून ठेवायचे आहे. त्यानंतर ते शिजवून घ्यायचे आहे. दाणे शिजवून घेतल्यानंतर भाजीसाठी ओला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर जिरे आणि कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडा कडक झाल्यानंतर त्यात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची.
advertisement
advertisement
हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात दाणे टाकून घ्यायचे आहे. दाणे सुद्धा त्यात 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात गरम पाणी टाकून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तसा रस्सा तुम्ही बनवून घेऊ शकता. त्यानंतर त्या रस्स्याच्या दोन ते तीन उकळी काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर भाजी तयार होईल. त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. चित्रांगी दाण्याची भाजी तयार झालेली असेल.









