5 मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी तयार करा ज्वारीचा पौष्टिक उपमा; रेसिपी पाहा PHOTOS

Last Updated:
नेहमीच नाश्त्यामध्ये आपण रव्यापासून बनवलेला उपमा खात असतो. मात्र ज्वारीचा उपमा देखील शरीरासाठी पौष्टिक आणि एक चांगला पदार्थ आहे.
1/7
सध्याच्या काळात दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी उत्तम हेल्दी नाश्ता करणे गरजेचे झाले आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात पौष्टिक आणि विविध कडधान्य युक्त असलेला नाश्ता आपल्या आहारातून गायब होत आहे. नव्या पिढीला गावाकडे बनवले जाणारे पारंपरिक पौष्टिक पदार्थ माहितीच नाहीत.

advertisement
2/7
 नेहमीच नाश्त्यामध्ये आपण रव्यापासून बनवलेला उपमा खात असतो. मात्र ज्वारीचा उपमा देखील शरीरासाठी पौष्टिक आणि एक चांगला पदार्थ आहे. हाच ज्वारीचा उपमा कसा बनवायचा हे आपण  मधीलगृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
नेहमीच नाश्त्यामध्ये आपण रव्यापासून बनवलेला उपमा खात असतो. मात्र ज्वारीचा उपमा देखील शरीरासाठी पौष्टिक आणि एक चांगला पदार्थ आहे. हाच ज्वारीचा उपमा कसा बनवायचा हे आपण बीड मधीलगृहिणी मंजुषा कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
3/7
अवघ्या पाच मिनिटांमध्ये तुम्ही नाश्त्यात ज्वारीचा उपमा बनवू शकता. चवीने परिपूर्ण ज्वारीचा उपमा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्वारीचा उपमा बनवायला खूप सोपा आहे. वयस्कर मंडळींना अनेकदा रव्याचा उपमा हा पचन होत नाही.

4/7
त्यामुळे त्यांना ज्वारीचा उपमा पचन होण्यासाठी अधिक सोईस्कर असतो. ज्वारीच्या उपमाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा उपमा बनवताना भाज्यांचाही वापर केला जातो. त्यामुळे ही डिश अजूनच हेल्दी होते, असे कुलकर्णी सांगतात.

5/7
ज्वारीच्या उपम्यासाठी लागणारे साहित्य : ज्वारीचा पीठ 1 वाटी‌, उडीद डाळ 1 चमचा, शेंगदाणे अर्धी वाटी, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, पाणी योग्यतेनुसार, लिंबू 1, चिरलेले टोमॅटो अर्धी वाटी, चिरलेला कांदा अर्धी वाटी, चिरलेल्या हिरव्या मिरच्या 2, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल 3 चमचे आणि आवश्यकतेनुसार मीठ

6/7
पहिल्यांदा ज्वारीचे पीठ चाळून घ्या आणि ते तांबूस होईपर्यंत भाजा. त्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घ्या. गरम तेलामध्ये मोहरी, उडीद डाळ, जिरे, हिरवी मिरची, शेंगदाणे, टोमॅटो, कढीपत्ता टाकून परता. नंतर त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून उकळी येऊ द्या.

7/7
उकळलेल्या मिश्रणात भाजलेले ज्वारीचे पीठ हळूहळू घालून मिश्रण एकजीव करा व मंद गॅसवर 5 मिनिटे शिजवा. उपमा तयार झाल्यावर गरम असताना त्यावर कोथिंबीर घाला आणि लिंबाच्या फोडीसह सर्व्ह करा. या पद्धतीने तुम्ही घरचा घरी ज्वारीचा उपमा बनवू शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement