दिवसभर राहाल फ्रेश; उन्हाळ्यात हे सरबत अमृतापेक्षा कमी नाही! Recipe

Last Updated:
उन्हाळ्यात पुदिन्याच्या पाण्याला विशेष मागणी असते. पुदिन्याचं पाणी प्यायल्याने शरिरात गारवा निर्माण होतो, शिवाय अन्नपचन सुरळीत होतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आज आपण पुदिन्याचं सरबत कसं बनवायचं याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
1/5
सर्वात आधी पुदिना पाण्यात घालून व्यवस्थित धुवून घ्या. मग पुदिन्याची पानं मोकळी करा. ही पानं पुढे वाटून घ्यायची आहेत.

advertisement
2/5
पुदिन्याची स्वच्छ धुतलेली मोकळी पानं मिक्सरमध्ये घेऊन त्यात आलं, चिंच आणि हिरवी मिरची घाला. मिश्रण व्यवस्थित बारीक झाल्यानंतर गाळून घ्या.

3/5
त्यात 2 ग्लास थंड पाणी मिसळून चमच्याने ढवळा. आता त्यात आमचूर, काळीमिरी पावडर, जिरा पावडर, काळं मीठ, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

4/5
पुदिन्याचं पाणी तयार झालंय, तुम्ही ते पिऊ शकता. परंतु त्यात तिखटपणा हवा असेल, तर चिमूटभर मिरची पावडर मिसळा.

5/5
शेवटी चमचाभर लिंबूपाणी मिसळून हे पाणी अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर आवडीनुसार बर्फाचे क्यूब घालून थंडगार पुदिन्याचं पाणी प्या.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement