Scented Candles : सुगंधी मेणबत्त्या मूड सेट करतील पण आरोग्य बिघडवतील! 'या' गंभीर आजाराचा वाढवतात धोका

Last Updated:
Side effects of burning scented candles : आजकाल घरात सुगंधित मेणबत्त्या जाळण्याचा ट्रेंड वाढला आहे, पण या कृतीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यातून निघणारा धूर आणि कण डोकेदुखी, चक्कर येणे, चिंता किंवा कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात. एका अभ्यासानुसार, मेणबत्ती जळत नसतानाही ती विषारी पदार्थ बाहेर टाकू शकते. चला पाहूया सुगंधी मेणबत्त्यांच्या दुष्परिणाम.
1/9
जागरणच्या वृत्तानुसार, जेव्हा आपण मेणबत्ती जाळतो, तेव्हा त्यातील हायड्रोजन आणि कार्बन युक्त रासायनिक संयुगे हवेत मिसळून जातात. जळणाऱ्या मेणबत्तीच्या कणांमधून काही प्रमाणात टोल्यूइन आणि बेंझिनचे अंशही बाहेर पडतात.

advertisement
2/9
विशेष म्हणजे टोल्यूइनचा वापर सामान्यतः पेंट थिनर आणि चिकटवणाऱ्या पदार्थांमध्ये होतो. तर जंगलातील आग, ज्वालामुखी आणि कोळसा किंवा तेल जळाल्यावर बाहेर पडणाऱ्या वायूंमध्ये बेंझिनचा समावेश असतो.

3/9
बेंझिनला कर्करोगकारक वायू मानले जाते, ज्यामुळे ल्युकेमिया आणि ब्लड कॅन्सर सारख्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो. बेंझिनचा मोठा भाग धूम्रपानातून शरीरात जात असला, तरी मेणबत्तीतून निघणारे त्याचे कण देखील हानिकारक असतात.

4/9
मेणाचा प्रकार आणि त्याची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. पॅराफिन मेण टाळणे फायदेशीर ठरते. कारण ते पेट्रोलियमपासून बनलेले असते आणि इतर मेणांच्या तुलनेत त्यातून जास्त हानिकारक वायू बाहेर पडतात. हे मेण स्वस्तही असते.

5/9
तुम्हाला सुरक्षितपणे मेणबत्ती जाळायची असेल, तर तुम्ही सोया वॅक्स, बीजवॅक्स किंवा स्टीयरिन वॅक्स असलेल्या मेणबत्त्याच निवडाव्यात. या नैसर्गिक मेणांमध्ये हानिकारक रसायने कमी असतात.

6/9
मेणबत्तीची वात कापूस, लाकूड किंवा सिंथेटिकची बनलेली असावी. त्यात शिसे किंवा जस्त सारखे धातू नसावेत. तसेच मेणबत्ती जळत असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा आणि खोली हवेशीर असल्याची खात्री करा.

7/9
तुम्हाला सुगंधित कॅण्डल आवडत असल्यास, आवश्यक तेल वापरलेल्या मेणबत्त्या निवडा आणि रासायनिक रंगांचा वापर केलेल्या मेणबत्त्या टाळा. तसेच स्वस्त मेणबत्त्यांपासून दूर राहा. कारण त्यात धोकादायक रसायने असण्याचा धोका जास्त असतो.

8/9
डोकेदुखी, श्वासोच्छ्वास किंवा डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी सुगंधित मेणबत्त्या फक्त थोड्या वेळासाठीच जाळाव्यात. गर्भवती महिला, लहान मुले किंवा श्वासोच्छ्वास संबंधित आजार असलेल्या रुग्णांच्या आसपास सेंटेड कॅण्डल जाळणे टाळावे.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement