एका छोट्याशा चुकीमुळे शिवसेना नेत्याच्या मुलीचा वाढदिवशीच मृत्यू; तुम्हीही नकळत तेच करताय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shivsena Leader Daughter Death : शिवसेना नेते दीपक कंबोज यांची मुलगी मुनमुन हिचा वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूचं कारण ठरली ती एक चूक. अशी चूक जी नकळतपणे अनेक जण करत आहेत. कदाचित तुम्हीही करत आहात. त्यामुळे आज मुनमुनच्या मृत्यूचं कारण ठरलेली ही चूक उद्या तुमचाही जीव घेऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्याबाबत सावध करत आहोत.
दीपक कंबोज हे पंजाबच्या जालंधरचे शिवसेना नेते. त्यांची मुलगी मुनमुन जिचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला वाढदिवस असल्याने घरात त्याची जोरदार तयारी सुरू होती. मुनमुन अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली, ती बाहेर आलीच नाही. बराच वेळ अंघोळीसाठी मुनमुन बाहेर न आल्याने घरच्यांनी दरवाजा वाजवला मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी बेशुद्ध पडलेल्या मुनमुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










