Detox Water For Skin : चमकदार त्वचेसाठी खास डिटॉक्स ड्रिंक्स; रोज प्या, त्वचा होईल आतून स्वच्छ-सुंदर!

  • Published by:
Last Updated:
Detox Water Recipes For Glowing Skin : निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर केवळ वरून काळजी घेऊन भागत नाही. आतूनही शरीराला पोषण देणे महत्त्वाचे आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही डिटॉक्स ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत. हे ड्रिंक्स तुमच्या त्वचेला नवचैतन्य डेरील आणि आणखी सुंदर बनवतील.
1/7
हे ड्रिंक्स अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी परिपूर्ण आहेत, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेला नैसर्गिक पोषण मिळते. चला तर मग तुमच्या त्वचेला ताजेतवाने करणार्‍या या चार डिटॉक्स ड्रिंक्स रेसिपीज पाहूया.

advertisement
2/7
अननस आणि हळदीचे ड्रिंक : हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला 1 कप चिरलेला अननस, 1 इंच हळदीचा तुकडा, 1 मध्यम आकाराची काकडी लागेल. हे सर्व एकत्र करून मिक्सरला फिरवा आणि त्याचे ड्रिंक बनवून घ्यावे. अननसमधील व्हिटॅमिन सी त्वचेतील कॉलेजनची निर्मिती वाढवण्यास मदत करते. तर हळदीतील शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवतात.

3/7
ग्रीन ज्यूस : हा ज्यूस बनवण्यासाठी 2-3 पाने केल किंवा पालक 1 हिरवे सफरचंद, 1 काकडी, 1 साल काढलेले लिंबू आणि 1 इंच आल्याचा तुकडा लागेल. हे सर्व एकत्र करून मिक्सरला फिरवा आणि त्याचा ज्यूस बनवून घ्या. या ज्यूसमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे स्वच्छ आणि निरोगी त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

4/7
स्ट्रॉबेरी डिटॉक्स वॉटर : स्ट्रॉबेरी हे केवळ चविष्ट फळ नाही, तर त्यातील सूक्ष्म पोषक तत्वे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. स्ट्रॉबेरीचे अँटी-एजिंग फायदे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात.

5/7
हे डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी तुम्हाला 2 कप स्ट्रॉबेरीचे तुकडे, 2 लिंबाचे काप, 3 कप पाणी, बर्फाचे तुकडे आणि काही पुदिन्याची पाने लागतील. सर्व घन घटक एका जारमध्ये घाला. नंतर त्यात 3 कप पाणी घाला. ते चांगले मिसळा आणि थंड होण्यासाठी एक तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर फ्रेश, थंड डिटॉक्स वॉटरचा आनंद घ्या.

6/7
सफरचंद दालचिनी पाणी : हे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला 1 सफरचंद, 1 जग पाणी, 1-2 दालचिनीच्या काड्या लागतील. एका जगमध्ये पाणी स्टोव्हवर गरम करा. पाण्यात सफरचंदाचे काप आणि दालचिनीच्या काड्या घालून हे मिश्रण किमान 45 मिनिटे उकळू द्या. आता दालचिनीचे पाणी एका काचेच्या पिचरमध्ये ओता आणि फ्रीजमध्ये ठेवा. शेवटी, ताज्या ड्रिंकचा लगेच आनंद घ्या. हे पेय सुमारे 2-3 दिवस टिकेल.

7/7
या डिटॉक्स ड्रिंक्सचा नियमित वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेला आतून निरोगी आणि चमकदार बनवू शकता. (अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement