कोल्हापूरला फिरायला जायचा प्लॅन करताय? ही 5 ठिकाण पाहिलाच हवी! PHOTOS

Last Updated:
कोल्हापुरातील बऱ्याचशा पर्यटन स्थळांना वर्षातील कोणत्याही काळात भेट देता येते. नव्या वर्षात मकर संक्रांत, भोगी आणि लोहरी सणानिमित्त कोल्हापूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही ठिकाणं तुम्ही नक्कीच पाहिली पाहिजेत.
1/6
कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर आहे. कोल्हापुरातील बऱ्याचशा पर्यटन स्थळांना वर्षातील कोणत्याही काळात भेट देता येते. नव्या वर्षात मकर संक्रांत, भोगी आणि लोहरी सणानिमित्त कोल्हापूरला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही ठिकाणं तुम्ही नक्कीच पाहिली पाहिजेत.

advertisement
2/6
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर. या मंदिराची वास्तुकला चालुक्य, होयसाळ आणि मराठा यासह विविध शैलींचे मिश्रण आहे. मंदिर एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे आणि दरवर्षी हजारो भाविकांना भुरळ घालत. कोल्हापूर ते येणारा प्रत्येक पर्यटक हा महालक्ष्मीला नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्या वरील कोरीव काम प्रेक्षणीय आहे. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. भवानी मंडप, जुना राजवाडा परिसर हे आकर्षण आहे.

3/6
रंकाळा तलाव : रंकाळा हे कोल्हापुरातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हा तलाव कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतींनी बांधला. महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांच्या खाणींमुळे रंकाळा तलावाचा खोल भाग निर्माण झाल्याचे सांगितले जाते. तलावाच्या मध्यभागी रंक भैरव देवाचे मंदिर आहे. रंकाळा तलावाला हे नाव देखील रंक भैरव या देवतेवरून पडले आहे. सहकुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी रंकाळा तलाव हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. रंकाळ्यातील सूर्यास्ताचे दृश्य चुकवू नये. तसेच नुकत्याच केलेल्या नूतनीकरणामुळे रंकाळ्याचे चित्र मरीन ड्राईव्ह सारखं झालंय. त्यामुळे नूतनीकरण झाल्यानंतर एकदा तरी भेट द्यायला हवीच.

4/6
 ज्योतिबा : कोल्हापुरातील वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) इथे हे हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर काळ्या दगडात असून इथे केदारलिंग, केदारेश्वर आणि रामलिंग या तीन मंदिरांचा समूह आहे. ज्योतिबाबाला दर वर्षातून खेटे घातले जातात. हे खेटे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. तसेच ज्योतिबाच्या यात्रेवेळ‌च्या उंच उंच सासनकाठ्या प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे बारा ज्योतिर्लिंग आहेत. कोल्हापुरपासून वीस- बावीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.

5/6
खिद्रापूरचे कोपेश्वर : शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे आहे. कोल्हापूरपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. हे खांब अत्यंत कोरीव नक्षीदार आहेत. यावर हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशिचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून मंदिराला घोषित केला आहे. असं हे मंदिर पाहण्यासाठी आपण एकदा तरी या ठिकाणाला भेट दिली पाहिजे.

6/6
दाजीपूर अभयारण्य : राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य आहे. हे अभयारण्य मुख्यत: गव्यासाठी प्रसिद्ध आहे. यात हरिण, सांबर, चितळ, बिबट्या, अस्वले, साळींदर, कोल्हा, निलगाय तसेच विविध जातींचे साप या ठिकाणी आढळतात. दाजीपूर अभयारण्यात वनविभागामार्फत या ठिकाणी तंबू निवास आणि भोजनाची व्यवस्था केली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement