Instant Lemon Pickle : दररोजच्या जेवणात चटकदार खायला हवंय? 'या' सोप्या पद्धतीने बनवा लिंबू क्रश 

Last Updated:
Lemon Crush Pickle Recipe : दररोजच्या जेवणात काहीतरी चटकदार असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. चटकदार म्हटलं की, प्रत्येकाला लोणचे आठवते. कैरीचे लोणचे, गाजर आणि मिरचीचे लोणचे तसेच लिंबाचे लोणचे अनेकांच्या आवडीचे असते. चला पाहूया त्याची रेसिपी.
1/11
लिंबू क्रश लोणचे हे चटकदार आणि बनवायला सोपे असल्याने प्रत्येकजण त्यावर ताव मारतात. प्रत्येकाची लोणचे बनविण्याची पद्धत वेगवेगळी असते. अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी असे लिंबाचे लोणचे कसे बनवायचे? त्याची रेसिपी जाणून घेऊया.

advertisement
2/11
लिंबू क्रश लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य 1 किलो लिंबू, अर्धा किलो साखर, मीठ, लाल तिखट आणि जिरे पूड, हे सर्व साहित्य तुम्हाला पाहिजे त्या चवीनुसार घ्यायचं आहे.

3/11
लिंबू क्रश लोणचे बनविण्याची कृती सर्वात आधी लिंबाचे काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया राहिल्यास लोणचे कडू होण्याची शक्यता असते.

4/11
नंतर काप केलेले लिंबू आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. लिंबाची खूप बारीक पेस्ट करायची नाही. थोडे बारीक काप त्यात राहायला पाहिजेत.

5/11
नंतर लोणचे बनविण्यासाठी स्टीलचे भांडे घ्यायचे आहे. लोणचे बनविण्यासाठी लोखंडी किंवा जर्मनचे भांडे वापरू शकत नाही. त्यात लोणचे अधिक आंबट होते. त्यामुळे स्टीलचे भांडे घ्यायचे आहे.

6/11
भांडे गॅसवर ठेवल्यानंतर त्यात लिंबाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. लगेच त्यात जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ते मिक्स करून घ्या.

7/11
मिक्स करून झालं की, साखर टाकून घ्यायची आहे. साखरेऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता. साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्या.

8/11
नंतर साखरेचा व्यवस्थित पाक होऊ द्यायचा आहे. मध्यम आचेवर हे लोणचे तयार करायचे आहे. कमीतकमी 20 मिनिटे पाक येण्यासाठी लागतात. नंतर पाक जाडसर झाला आणि छान कलर आला की लोणचे तयार झालेले असेल.

9/11
नंतर 1 तास हे थंड होऊ द्यायचे आहे. त्यासाठी यावर कापड झाकून ठेवू शकता. 1 तासानंतर लोणचे छान तयार झाले असेल. आता हे तुम्ही काचेच्या भांड्यात साठवून ठेवू शकता.

10/11
हे लोणचे आरामात वर्षभर टिकते. चवीला अतिशय टेस्टी असे चटपटीत लोणचे तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा.

11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement