Winter Care Tips: हिवाळ्यात घरात थंडीला नो एंट्री, फक्त लावा ग्रीन हीटर, या वनस्पतींमुळे राहिल उबदार वातावरण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
घर आणि ऑफिसचे वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी, शोभेसाठी आपण इंडोअर प्लांट ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का? इंडोर प्लांट घर/ऑफीसला फक्त शोभाचं नाही तर हिवाळ्यात ऊब सुध्दा देतात.
advertisement
एरिका पाम ही वनस्पती घरातील हवेत आर्द्रता टिकवून ठेवते. त्यामुळे हिवाळ्यातील कोरडी हवा कमी होते आणि घर नैसर्गिकरित्या उबदार राहते. या झाडाची निगा राखणे खूप सोपे आहे. कारण या झाडाला दररोज पाण्याची आवश्यकता नसते. एरिका पाम झाडाला थेट सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवू नये. रबर वनस्पती रबराची दाट हिरवी पाने उष्णता शोषण घेतात आणि घरातील तापमान संतुलित ठेवतात.
advertisement
शिवाय, ही हवा शुद्ध करण्यासाठीही उत्कृष्ट ठरते. रबराचे झाड आपल्या घरामध्ये कमी सूर्यप्रकाश पोहचतो अशा जागी ठेवा. तसेच भांड्यातील माती पूर्णपणे कोरडे झाल्यावरच त्यात पाणी घालावे. स्नेक वनस्पती ही वनस्पती रात्री ऑक्सिजन सोडते, ज्यामुळे घरातील हवा ताजी राहते आणि हिवाळ्यातील बंद वातावरणात उबदारपणा टिकतो. घरातील हवेत आढळणारी इतर कठोर रसायने शोषून घेण्यास प्रभावी आहे.
advertisement
advertisement
advertisement
कोरफड शक्यतो घरात खिडकीजवळ ठेवावी. तिला भरपूर सूर्यप्रकाशाची आणि अत्यंत कमी पाण्याची गरज असते. पीस लिली ही वनस्पती आर्द्रता टिकवून ठेवते आणि हिवाळ्यातील कोरडी हवा टाळते. त्यामुळे घरातील वातावरण ओलसर आणि उबदार राहते. पीस लिलीसाठी घरातील जास्त सुर्यप्रकाशाची जागा निवडा. आठवड्यातून एकदाच पाणी घाला.
advertisement


